
अलिबाग : ऐन थंडीच्या मोसमात रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर चढला असून सर्वच राजकीय पक्षांची यानिमित्ताने मोठी कसोटी लागणार आहे. या टप्प्यात २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.
१८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपले नशीब अजमावताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सरपंचपदाच्या २४० जागांसाठी ९०१ अर्ज दाखल झाले. तर १९४० सदस्य पदांसाठी ४३८२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापबरोबरच नव्याने निर्माण झालेली बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटदेखील पहिल्यांदाच सर्व ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे छोटे छोटे युनिट प्रत्येक गावात पाहायला मिळतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी एकाच राजकीय पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवताना अनेक राजकीय अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे या वेळी स्वबळावर निवडणुका लढवण्याऐवजी युती- आघाडय़ांची समीकरणे जुळवताना पाहायला मिळत आहेत. मात्र ही समीकरणे जुळवताना वरिष्ठांच्या नाकीनऊ येत आहेत. वर्षांनुवर्षे सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हे यामागचे प्रमुख कारण ठरते आहे.
शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी एकत्र येत बऱ्याच गावांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना दिसत आहेत. तर शिंदे गट स्वतंत्रपणे आपली ताकद अजमावत आहे. शेकापने अलिबाग तालुक्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत घरोबा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; परंतु त्याला अपेक्षित यश येताना दिसत नाही. त्यामुळे नेतेमंडळींना कसरत करावी लागते आहे. सरपंच किंवा सदस्यपदासाठी एकापेक्षा अधिक इच्छुक पुढे आल्याने अडचण झाली आहे.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




