वॉशिंग्टन डीसीच्या कॅपिटल हिलवर सत्तेचे संतुलनबदलते. तेव्हा जगभरातील परराष्ट्र मंत्रालये त्याचे दूरगामीपरिणाम तपासण्यात व्यग्र होतात. बुधवारी जाहीरमध्यावधी निवडणुकीच्या धक्कादायक निकालांनीअमेरिकेतील अभूतपूर्व अस्थिरतेच्या दोन वर्षांवरशिक्कामोर्तब केले. हा ट्रम्प यांच्या कारभाराविरोधातीलऐतिहासिक जनादेश आहे. अमेरिकेच्या इतिहासात ट्रम्पयांच्याइतका हुकूमशाही वृत्तीचा दुसरा नेता झालेलानाही. या अपमानास्पद पराभवामुळे ते अधिकच टोकाची भूमिका घेऊ शकतात. डेमोक्रॅट्सने हाऊस आणि सिनेटकडे पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे ट्रम्पयांच्या दुसऱ्या कार्यकाळाला शक्ती देणाऱ्या आणि त्यांना बिनधास्त, अनिर्बंध सत्ता देणाऱ्या रिपब्लिकन सत्तेच्या संरचनेला मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी या सत्तेचा हवा तसा गैरवापर केला होता. या निकालांनी ट्रम्प यांना वैयक्तिकरीत्या दुखावले. कारण त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मतदानापूर्वीच्या जवळपास प्रत्येक सभेत ते गर्जना करत होते, "मी स्वतःच उमेदवार आहे असे समजून मतदान करा.’ ट्रम्प स्वतःला अडचणीतपाहातात, तेव्हा ते काँग्रेसला बाजूला सारतात. त्यांचेसल्लागार अनेक आठवड्यांपासून या परिस्थितीचासामना करण्याची तयारी करत आहेत. याचा अर्थ आताभारताला अशा ट्रम्प यांच्यासाठी तयार राहावे लागेल.परदेशात आपली ताकद दाखवण्यासाठी आणि देशांतर्गतपराभवावरून लक्ष हटवण्यासाठी आपल्या अधिकारांचाअमर्याद वापर करू शकतात. यासाठी ते जकात,स्थलांतरावरील बंधने आणि आर्थिक धमक्यांचा शस्त्रम्हणून वापर करू शकतात. व्यापार करार आणिभारताकडून होणारी रशियन तेलाची आयात अशामुद्द्यांवर ते नवी दिल्लीवर दबाव आणण्याचा पूर्ण प्रयत्नकरतील, अशी दाट शक्यता आहे. भारताच्या तेलआयातीवरील अवलंबित्वाचा फायदा उठवत ते एच-1बीव्हिसाबाबतही गंभीर अडथळे निर्माण करू शकतात. ट्रम्प परराष्ट्र धोरणाकडे पूर्णपणे देवाणघेवाणीच्या‘अमेरिका फर्स्ट’ या दृष्टिकोनातून पाहातात. याचा अर्थअसा की, त्यांचे प्रशासन अमेरिकन संरक्षणवादालाआणखी खतपाणी घालू शकते आणि ‘स्थलांतरितनागरिक अमेरिकनांच्या नोकऱ्या हिरावून घेत आहेत’यासारख्या वक्तव्यांना अधिक हवा देऊ शकते. यामुद्द्यांवर काँग्रेसला बाजूला सारण्याचा आपला इरादात्यांनी आधीच स्पष्ट केला आहे. एच-1बी व्हिसाचा मुद्दाहे भू-राजकीय दबाव आणण्याचे मोठे हत्यार आहे. हेट्रम्प चांगल्या प्रकारे जाणून आहेत. याद्वारे ते जागतिकस्तरावर आपल्याला अडचणीत आणू शकतात. जोपर्यंतआपण आपली ऊर्जा धोरणे अमेरिकेच्या मागण्यांनुसारबदलत नाही, तोपर्यंत आपल्या तंत्रज्ञान तज्ज्ञांसाठी दारेबंद करण्याची धमकी ते देऊ शकतात. आतापर्यंत ट्रम्पप्रशासन आमचा हा युक्तिवाद मान्य करत होते की,सुमारे 1.5 अब्ज नागरिकांना महागाईपासूनवाचवण्यासाठी परवडणारी ऊर्जा आवश्यक आहे. परंतुआता त्यांच्याकडून संयमाची अपेक्षा करता येणार नाही.पण डेमोक्रॅट्सचे बहुमत असलेली काँग्रेस संरक्षणनिर्यातीच्या नियमांची कडक तपासणी करेल. ट्रम्प यांच्यानजरेत भारत हा असा भागीदार आहे, ज्याच्यावर दबावआणता येऊ शकतो. चीनचा सामना करण्यासाठीभारताला महत्त्वाचे लष्करी तंत्रज्ञान हस्तांतरित करणेगरजेचे आहे. अशा मित्राच्या दृष्टीने ते आपल्याकडेपाहत नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेता, अमेरिकेच्या मूळभू-राजकीय हितांना स्पर्श करेल अशा मुत्सद्देगिरीचाअवलंब आपल्याला करावा लागेल. पहिले पाऊलम्हणजे भारतीय मुत्सद्द्यांनी अमेरिकन काँग्रेसमधीलदोन्ही पक्षांच्या नवनिर्वाचित नेतृत्वाशी थेट , सक्रियसंवाद प्रस्थापित करावा. दुसरे म्हणजे अमेरिकेतीलप्रमुख तंत्रज्ञान कंपन्या, संरक्षण उत्पादन क्षेत्रातीलकंपन्यांशी आपण घट्ट धोरणात्मक युती केली पाहिजे.पश्चिम युरोप, जपानसोबत तंत्रज्ञान व ऊर्जा क्षेत्रातीलभागीदारी अधिक मजबूत करून, आपल्या आर्थिकअवलंबित्वात विविधता आणण्याची प्रक्रियाही जलदकेली पाहिजे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आपल्या मुत्सद्द्यांनी अमेरिकनकाँग्रेसमधील दोन्ही प्रमुख पक्षांच्यानवनिर्वाचित नेतृत्वाशी थेट संवाद साधणेगरजेचे आहे. तसेच आपल्या आर्थिकअवलंबित्वात विविधता आणण्याच्याप्रक्रियेला गती देणेही आपल्यासाठीआवश्यक झाले आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




