काही राज्यांनी ‘माइन्स अँड मिनरल्स अॅक्ट 2026’ला (खाण आणि खनिज कायदा) विरोध केला आहे. खाणकामातून मिळणाऱ्या त्यांच्या कर उत्पन्नावर याचा परिणाम होईल, अशी भीती त्यांना वाटते. सुधारित कायद्यात खाणकामावरील केंद्राच्या नियंत्रणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता यात खाण आणि खनिज विकासासोबतच खनिजयुक्त जमिनीचाही समावेश करण्यात आला आहे. केंद्राने ठरवून दिलेल्या अटींव्यतिरिक्त, राज्यांना खनिज अधिकारांवर आणि खनिजयुक्त जमिनीवर नवीन कर लावण्यापासूनही हा कायदा रोखतो. हा कायदा लागू होईपर्यंत, राज्यांनी लावलेले आणि अद्याप वसूल न झालेले खनिज करदेखील हा कायदा रद्द करतो. झारखंड आणि ओडिशासारख्या राज्यांच्या बिगर-कर महसुलात खनिजांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा जवळपास 80% आहे. अशा स्थितीत या राज्यांच्या खनिज कर लावण्याच्या आणि वसूल करण्याच्या क्षमतेवर निर्बंध आणल्यास त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. तेलंगणात हा वाटा 11% आणि छत्तीसगडमध्ये 6% आहे. यावरून असे दिसते की, महसुलाच्या बाबतीत ती राज्ये खनिजांवर फारशी अवलंबून नाहीत. त्यामुळे या राज्यांवर नवीन तरतुदींचा तात्काळ आर्थिक परिणामही मर्यादित असू शकतो. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्येदेखील खनिज महसुलावर बरीच अवलंबून आहेत. बिगर-कर महसुलात खनिजांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा कर्नाटकात 48८%, मध्य प्रदेशात 41% आणि राजस्थानमध्ये 39% आहे. पण या सुधारित कायद्यावर या सर्व राज्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या राहिल्या आहेत. या संदर्भात ओडिशाची प्रतिक्रिया विशेष उल्लेखनीय आहे. बिगर-कर महसुलाचा मोठा हिस्सा खनिजांतून मिळत असूनही, या कायद्याबाबत राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांची प्रतिक्रिया सारखी नाही. विरोधी पक्ष असलेल्या बीजेडीने या कायद्यावर कडक टीका केली आहे. भाजप सरकारने ही मागणी फेटाळून लावली आहे. या दुरुस्तीमुळे ओडिशाच्या खनिज महसुलाचे नुकसान होणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. तेलंगणात खनिजांतून मिळणारे उत्पन्न राज्याच्या बिगर-कर महसुलाच्या केवळ 11% आहे. असे असूनही तेथील सरकार इतर बिगर-भाजपशासित राज्यांसोबत या नव्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. या कायद्याबाबत राजकीय प्रतिक्रियांमधील हा फरक इतर राज्यांतही दिसून येतो. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि केरळ या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. खनिज अधिकारांवर आणि खनिजयुक्त जमिनीवर कर लावण्याची राज्य सरकारची क्षमता कमी करणे चुकीचे आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. यामुळे राज्यांचे आर्थिक अधिकार आणि संघराज्य प्रणालीची तत्त्वे कमकुवत होतात, असे त्यांचे म्हणणे आहे. खनिजयुक्त जमिनीबाबत असा दृष्टिकोन ठेवल्याने, राज्याच्या किनारपट्टी आणि वनक्षेत्रावरही केंद्राचे अधिकार वाढतात, असे केरळने म्हटले आहे. खनिज करातून मिळणाऱ्या महसुलात घट झाली, तर त्याचा परिणाम सामाजिक सुरक्षा योजनांवर होऊ शकतो. याचा फटका लाखो लाभार्थींना बसेल, असा इशारा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिला आहे. कारण सुधारित कायदा मागील काही थकीत करांच्या वसुलीलाही अवैध ठरवतो. मात्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या राज्यांच्या सरकारांनी या कायद्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असंतोषाचा हा राजकीय भूगोल भारतीय संघराज्यवादाचे एक रंजक वैशिष्ट्य दाखवतो. राज्यांचे आर्थिक अधिकार कमी होणे ही इथली प्रमुख चिंता असली, तरी एखादा मुद्दा किती प्रमाणात प्रबळ मुद्दा बनेल, हे वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या समीकरणांवरच अवलंबून असते. खनिजांवरील अवलंबित्व हा आर्थिक हिताचा मुद्दा आहे. पण हे हितसंबंध केंद्राविरुद्धच्या संघटित आव्हानात बदलतील की नाही, यावर राजकीय समीकरणेही प्रभाव टाकतात. भारतासारख्या संघराज्य व्यवस्था असलेल्या देशात केंद्र आणि राज्यांमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद असणे, ही काही असामान्य गोष्ट नाही. संविधानाने दोघांमध्ये अधिकारांची विभागणी केली असली, तरी जेव्हा केंद्र आणि राज्यांत वेगवेगळ्या पक्षांची सरकारे असतात, तेव्हा असे मतभेद उफाळून येण्याची शक्यता अधिक वाढते. कायदेविषयक अधिकार, आर्थिक संसाधने, प्रशासकीय नियंत्रण आणि अगदी परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यांवरूनही केंद्र आणि राज्यांतील संघर्ष वेळोवेळी समोर आले आहेत. खनिज कायद्यातील सुधारणेने यात भर घातली आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एखादा मुद्दा किती प्रमाणात संघीय मुद्दा बनेल, हे वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या समीकरणांवरच अवलंबून असते. खनिजांवरील अवलंबित्व हा आर्थिक हिताचा मुद्दा आहे. पण राजकीय समीकरणेही यावर प्रभाव टाकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




