भारतासोबत पाकिस्तानच्या युद्धांचा इतिहास कसा राहिलाआहे? सामरिकदृष्ट्या ठीक, पण रणनीतिकदृष्ट्या नुकसानदायी. त्यामुळेच पूर्ण शक्तीने सुरुवात करूनही तोप्रत्येक युद्ध हरतो. मात्र 1971 आणि कारगिल युद्ध वगळतापाकिस्तानने बहुतांश युद्धांत विजयाचा दावा केला आहे. गतवर्षी झालेल्या 87 तासांच्या चकमकीकडेच पाहा.मुनीरपासून पाकिस्तानच्या राजकारणातीलतळागाळापर्यंत सर्वांनाच वाटते की यावेळी विजयत्यांचाच झाला. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानलाजवळ केले. त्यालाच त्यांच्या स्वयंघोषित ‘विजया’लामान्यता मानले. प्रत्यक्षात मात्र पहलगाम हत्याकांडाच्याफक्त चार दिवस आधी आणि ऑपरेशन सिंदूरच्या सुमारेदोन आठवडे आधी स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा जॅकयाचा दौरा आणि क्रिप्टो करार पूर्ण झाला होता. भारतपहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे मुनीर यांना माहितीहोते. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाच्या लोभाचा फायदा घेण्याचीचाल त्यांनी आधीच आखली होती. जगातील अनेकलोकांपेक्षा आधी ही बाब समजून घेतल्याबद्दल मुनीर यांचेकौतुक करता येईल किंवा कदाचित सौदी अरेबियानेत्यांना आधीच सावध केले असेल. लढाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ट्रम्प यांच्या ‘सिस्टम’लाआपल्या बाजूने वळवले होते. 16 एप्रिल 2025 रोजीपरदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींना दिलेल्या त्यांच्याभाषणातून त्याचे संकेत मिळाले होते. ते हत्याकांडभारताची प्रतिक्रिया पाहण्याच्या त्यांच्या योजनेचाच भागहोता. ट्रम्प यांना आपल्या बाजूने करून काश्मीर मुद्दा पुढेआणणे, हे त्यांचे रणनीतिक उद्दिष्ट होते. पहिली चालयशस्वी झाली. पण दुसरी पूर्णपणे अपयशी ठरली. भारत लष्करी कारवाई करेल, हे माहीत असूनच पाकिस्तानने भारताला चिथावणी दिली होती. त्यामुळे कोणत्याठिकाणांना लक्ष्य केले जाईल, याचाही त्यांना अंदाजअसावा. भारत कोणती शस्त्रे वापरेल, हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे 7 मे रोजी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनीभारतीय वायुदलाने उड्डाण केले, तेव्हा पाकिस्तान सज्जहोता. आतील भागांतील लक्ष्यांवरील हल्ले ते रोखू शकले नाहीत. पण तो त्यांचा उद्देशही नव्हता. ते प्रत्युत्तर केवळहवाई संघर्षापुरते मर्यादित ठेवू इच्छित होते. एईडब्ल्यूविमाने आणि जे-10सी, जेएफ-17सह पीएल-15 क्षेपणास्त्रांच्या मदतीने या कारवाईचा आधीच सरावकरण्यात आला होता. त्यांना काही प्रमाणात यशहीमिळाले आणि त्याचाच ते उत्सव साजरा करत आहेत. भारतामध्ये उच्च पातळीवर काही विमानांच्या नुकसानीची बाब मान्य करण्यात आली आहे. माजी सीडीएस यांनीत्याला ‘सामरिक चूक’ म्हटले, पण भारतीय हवाई दलाने हिशेब चुकता करण्याची योजना आखली. सर्वप्रथम पाकिस्तानच्या हवाई दलावर दबाव आणण्यासाठी अँटी-रेडिएशन ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. त्यानंतर पीएएफच्या सर्वाधिक सुरक्षित हवाई तळांवर सलग हवाई हल्ले झाले. पीएएफ प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली. तेव्हा फक्त एकाबाजूकडेच दुसऱ्या बाजूचे नुकसान किती झाले, याचेपुरावे होते. व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रांतूनपीएएफचे किमान 13 हवाई तळ आणि 3 रडार उद्ध्वस्तझाल्याचे दिसत होते. तरीही पाकिस्तान विजयाचा जल्लोषकरत आहे. एका भारतीय कमांडरने म्हटले की, हे अगदीहॉकी सामन्यासारखे होते. भारताने पाकिस्तानला 3-1 नेहरवले. पण त्यांचा सेंटर फॉरवर्ड एक गोल करण्यातयशस्वी झाला आणि आपल्या खेळाडूंनी तीन पेनल्टीचेगोलमध्ये रूपांतर केले. भारताला नुकसानपोहोचवल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचा कोणताही पुरावानाही. भारतातील सर्व हवाई तळांच्या आसपास शहरेआहेत. काहीही लपलेले नाही, तरी कोणतीही उपग्रहछायाचित्रे समोर आलेली नाहीत. पाकिस्तानचे सर्व दावेनिरर्थक आहेत. मात्र, येथे मी अलीकडचा इतिहास पुन्हासांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर एका मुख्य मुद्द्यावरभर देत आहे. तो म्हणजे पाकिस्तानी लष्करी विचारसरणीचांगला विचार करते, पण केवळ सामरिक डावपेचांच्यापातळीवर. भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, याचा अंदाजती बांधू शकत नाही. ही अंतर्गत कमजोरी, भारतीयलष्कराबद्दलचा अनादर किंवा दोन्हींचा मिलाफ असूशकतो. हा विचार आपल्याला पाकिस्तानी लेखक शुजानवाज यांच्या ‘क्रॉस्ड स्वॉर्ड्स’ या पुस्तकातूनही मिळतो. कारगिल युद्धाबाबत त्यांनी लिहिले आहे की, भारताविरुद्ध‘वॉर गेम’ खेळणाऱ्या पाकिस्तानी पथकाने वाजपेयीसरकार कसे प्रत्युत्तर देईल, याचा अचूक अंदाज बांधलाहोता. तो गंभीरतेने घेतला असता तर पाकिस्तान पराभव,माघार आणि अपमान टाळू शकला असता. मात्र, त्याचीखिल्ली उडवण्यात आली. सामरिकदृष्ट्या कारगिल युद्धअत्यंत प्रभावी होते. भारताने प्रतिकार केला तर कायहोईल, याचा कोणी विचारच केला नाही. त्यासाठीरणनीतिक विचार गरजेचा असतो. पाकिस्तानमध्ये त्याचीकमतरता आहे. कारगिल रणनीतिक पराभव ठरला. कारणत्यामुळे नियंत्रण रेषेची जागतिक मान्यता अधिक मजबूतझाली. इस्लामाबाद विमानतळावर थोडा वेळ थांबून बिलक्लिंटन यांनी पाकिस्तानला कॅमेऱ्यासमोर सांगितले होतेकी, या उपखंडाच्या नकाशावरील सीमा आता रक्तसांडून बदलता येणार नाहीत. ही कथा यापूर्वीच्या युद्धांतहीदिसून आली. 1965 मध्ये छंब ताब्यात घेण्यासाठीऑपरेशन जिब्राल्टर आणि त्यानंतर अखनूर ताब्यातघेण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम राबवण्यात आले.जेणेकरून काश्मीर भारतापासून वेगळे करता येईल. पाकिस्तानी लष्कराने गृहित धरले होते की, भारत काश्मीरसोडून देईल. भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराचा त्यांनी योग्यविचारच केला नाही. त्याच युद्धात खेमकरण येथेरणगाड्यांद्वारे करण्यात आलेला अनपेक्षित हल्लाउपखंडातील सर्वांत धाडसी हल्ल्यांपैकी एक मानलाजातो. त्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई म्हणजेपाकिस्तानचा पराभव आणि त्याच्या सर्वोत्तमरणगाड्यांचा नाश. त्या युद्धातही पाकिस्तानने विजयाचादावा केला होता. दुर्देव हे आहे की पाक 6 सप्टेंबरला‘डिफेन्स ऑफ पाकिस्तान डे’ म्हणून साजरा करतो! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) इतिहासाचा धडा आहे...ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने चुकीचाधडा घेतला आहे. अशा परिस्थितीतपाकिस्तान पुढे कोणती चिथावणीखोरकारवाई करू शकतो, याचा अंदाजआधीच घ्यावा लागेल. इतिहास सांगतोकी, पाकिस्तानी सत्ता सर्वात वाईटस्थितीत पोहोचते तेव्हा ती स्वतःचेचनुकसान करणारे रणनीतिक निर्णय घेते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
- पुणे: एक मराठा, लाख मराठा च्या गगनभेदी घोषणा; मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्यातील कात्रज चौकात मराठा समाज आक्रमक, केला रास्ता रोको
महाराष्ट्र
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- नाशिक: आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर भर द्या; राहुल गांधींच्या दीर्घकालीन बैठकीनंतर आंदोलक विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना!
- अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ३८ लाखांचा आर्थिक घोटाळा; संशोधन संचालकांसह ७ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला




























Subscribe to my channel




