अलीकडेच राहुल गांधी यांनी विचारले होते की, दशकाहून अधिक काळ सत्तेत राहूनही भाजप सत्ताविरोधी लाटेपासून इतका अप्रभावित का दिसतो? ते म्हणाले, माझ्या आजीलाही १९७७ मध्ये सत्ताविरोधी लाटेत पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर त्यांनी आरोप केला की, हे केवळ निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्यामुळेच शक्य आहे. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला अलीकडे धक्का बसला आहे, हे राहुल यांचे म्हणणे मान्य करता येईल. एसआयआरअंतर्गत मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जाणे आणि अपीलांवरील निर्णयाला होत असलेल्या विलंबामुळे पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. बंगालमध्ये आतापर्यंत २२ लाख नागरिकांनी अपील केले आहे. ज्या अपीलांवर सुनावणी झाली, त्यापैकी ९३ टक्के जण वैध मतदार असल्याचे आढळले आहे. हे देखील विसरता कामा नये की, बिहारमध्ये मतदान सुरू असताना सरकारला रोख रक्कम हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यात आली, आसाममध्ये उघडपणे द्वेषपूर्ण भाषणांवर कोणतीही कारवाई झाली नाही, मान्यताप्राप्त पक्षांकडून निवडणूक चिन्हे काढून घेऊन पक्षांतराला वैध ठरवण्याचे प्रयत्न झाले आणि सत्ताधारी पक्षाच्या सोयीने निवडणूक कार्यक्रम ‘समायोजित’ करण्यात आला. त्यामुळे आयोग आपल्या कामकाजाबाबत उपस्थित होत असलेल्या चिंता केवळ राजकीय आरोप म्हणून फेटाळून लावू शकत नाही. पण याच ठिकाणी राहुल गांधींकडून चूक होण्याचा धोकाही आहे. भाजपचे निवडणुकीतील वर्चस्व मुख्यतः कोणत्यातरी गैरप्रकाराचा परिणाम आहे, असे म्हणणे म्हणजे राजकीय घडामोडींशी संबंधित अस्वस्थ करणाऱ्या तथ्यांकडे दुर्लक्ष करणे होय. त्यामुळे काँग्रेस आणि विरोधकांना आपल्या राजकीय कमकुवतपणापासून बचाव करण्याची संधीही मिळते. सर्वांत थेट प्रश्नच घेऊया : भारतातील निवडणूक सर्वेक्षण संस्था देखील या कटाचा भाग आहेत का? २०१४ नंतर झालेल्या सलग निवडणुकांनी दाखवून दिले आहे की नरेंद्र मोदींची वैयक्तिक लोकप्रियता अजूनही बरीच मजबूत आहे, विशेषतः हिंदी पट्टा आणि पश्चिम भारताच्या मोठ्या भागात. निवडणूक सर्वेक्षणे कधीकधी वाईटरीत्या चुकीचीही ठरतात, पण त्यामागील वास्तविक घटनाच नाकारणे म्हणजे गेल्या दशकात भारतीय राजकारणात झालेला बदल समजून घेण्यात अपयशी ठरणे होय. भाजपने एक अत्यंत मजबूत राजकीय आणि संघटनात्मक यंत्रणा उभी केली आहे, जिची बरोबरी करण्यात काँग्रेसला सतत संघर्ष करावा लागला आहे. तिच्याकडे विशाल कार्यकर्ता जाळे आहे, आरएसएसची यंत्रणा आहे, मुबलक आर्थिक संसाधने आहेत, आक्रमक संवादयंत्रणा आहे, स्पष्ट वैचारिक आधार आहे आणि राष्ट्रीय चर्चाविश्वाचे निवडणूक प्रचारात रूपांतर करण्याचा पुरेसा अनुभव आहे. एका शक्तिशाली निवडणूक यंत्रणेचा प्रभाव समजावून सांगण्यासाठी कोणत्याही कट सिद्धांताची गरज नाही. खरा प्रश्न असा आहे की, अनेक दशके सत्तेत राहूनही तिचा प्रतिस्पर्धी तशीच निवडणूक यंत्रणा उभी करण्यात का अपयशी ठरला. काँग्रेसच्या सर्व समस्यांची जबाबदारी निवडणूक आयोगावर टाकता येणार नाही. नेतृत्वावरून सुरू असलेली रस्सीखेच, संघटनेचे कमकुवत होणे, गटबाजी, पक्षांतर, राज्यांमधील कमकुवत संघटनात्मक रचना आणि कोणतेही प्रभावी पर्यायी राजकीय कथानक मांडता न येणे—या सर्वांनी काँग्रेसच्या अधोगतीत भूमिका बजावली आहे. एकापाठोपाठ अनेक राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपशी मुकाबला करण्यापूर्वीच काँग्रेस स्वतःशीच लढताना दिसली आहे. अशा परिस्थितीत आज प्रश्न हा नाही की मोदींच्या विरोधातील सत्ताविरोधी लाट का प्रभावी ठरत नाही? तर हा आहे की विरोधक सत्ताविरोधी लाटेला टिकाऊ राष्ट्रीय पर्यायामध्ये का रूपांतरित करू शकले नाहीत? प्रत्येक पराभवाचे खापर पंचावर फोडता येत नाही. आकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर नसतात, पण ते राजकीय बदलाची एक झलक नक्कीच देतात. याला ‘मोदीत्व’ म्हणा, हिंदुत्व म्हणा, संघटनात्मक श्रेष्ठता म्हणा किंवा निवडणुका जिंकण्याची क्षमता—भाजपच्या यशाचे श्रेय केवळ निवडणूक आयोगाच्या खात्यात जमा करता येणार नाही. काँग्रेसलाही आपल्या उणिवांचे उत्तर द्यावे लागेल. (ही लेखकाची स्वतःची मते आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
महाराष्ट्र
- पुणे: तुझ्या तोंडात विरोधकांनी शोधलेला सोन्याचा चमचा मला कधीच दिसला नाही; आप्पासाहेब पवारांच्या काळापासूनचा संघर्षाचा प्रवास सांगत रोहित पवारांच्या वडिलांची अत्यंत भावनिक पोस्ट
- मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबईबाहेर जाण्याची वेळ; ४९ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा एल्गार, २५ ऑक्टोबरला आझाद मैदानात पुन्हा धडकण्याचा इशारा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर
- नवी दिल्ली: 'इंडिया' आघाडीत अंतर्गत वाद उफाळला! तृणमूलच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल गांधींवर जुन्या मित्रपक्षाचीच कडक टीका; म्हणाले, "तुम्ही दुतोंडी आहात"
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी





















Subscribe to my channel


