बांगलादेशात मोठ्या हिंसाचारानंतर सत्ता परिवर्तन झाले. सुरूवातीपासूनच भारत आणि बांगलादेशातील संबंध तसे चांगले राहिले. मात्र, मागील काही महिन्यांपासून हे संबंध ताणताना दिसली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला निवडणुकीत बहुमत मिळाले आणि तारिक रहमान यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. बांगलादेशचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून तारीक रहमान मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. शिवाय त्यांच्याकडून भारतासोबतचे संबंध सुधारण्याकरिता प्रयत्नही केला जात आहे. काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदू लोकांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. आता तारीक रहमान यांनी आपल्या हातात कारभार घेतल्यापासून हिंदू लोकांवरील होणारे अत्याचार कमी झाली. यादरम्यान त्यांनी लष्करात मोठे फेरबदल करण्याचाही निर्णय घेतला. कारण बांगलादेशमधील हिंसाचार बघता हे निर्णय घेणे महत्वाचे आहे.
लष्कराने भारतातील बांगलादेश उच्चायुक्तालयात पूर्वी काम करणाऱ्या व्यक्तीकडे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ढाकामधील एका वृत्तानुसार, लष्कराच्या मुख्यालयाने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. लेफ्टनंट जनरल एम. मैनुर रहमान यांची सीजीएस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा मोठा बदल नक्कीच म्हणावा लागेल. लेफ्टनंट जनरल एम. मैनुर रहमान यांनी यापूर्वी आर्मी ट्रेनिंग अँड डॉक्ट्रिन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम केले.
भारतातील बांगलादेश उच्चायोगाचे सुरक्षा सल्लागार ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हफिजुर रहमान यांना मेजर जनरल पदाच्या इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यांना भारतातून परत बांगलादेशात बोलावण्यात आले. मागील काही वर्षांपासून ते भारतातील बांगलादेश उच्चायोगाचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत होते.
तारीक रहमान यांनी अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, ज्यावेळी बांगलादेश अनेक समस्यांना झुंज देत आहे. बांगलादेशात प्रचंड तणावाची स्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच मोठा हिंसाचार झाला. भारतही दुरावला गेला. बांगलादेशातील भारतीय दूतावास कार्यालयावरही मोठा हल्ला करण्यात आला होता. ज्याचा भारताकडून जोरदार समाचार घेण्यात आला.
शहर
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
महाराष्ट्र
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
- नागपूर: वंदे मातरमचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी; चंद्रशेखर बावनकुळे यांची आक्रमक मागणी
- पुणे: मोशी दुर्घटनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा; आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भाजपचे नेते प्रशांत शितोळे यांचे जोरदार प्रत्युत्तर
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




