सायंकाळ होताच भारतात बसस्टॉपवर उभी असलेलीएखादी महिला बसच्या रूट नंबरकडे पाहण्यापूर्वी आकाशाकडे पाहते. कारण तिला पावसाची चिंता नसते,तर अंधार पडल्यानंतर महिलांसाठी प्रत्येक गोष्टीचे अर्थबदलतात. रात्री बाहेर पडलेल्या पुरुषाकडे एक सामान्यप्रवासी म्हणून पाहिले जाते. पण सूर्यास्तानंतर एखादीमहिला बाहेर दिसली, तर प्रश्न उपस्थित होतात. कुठेचालली आहे? एकटी का आहे? तिची वाट कोण पाहतआहे? म्हणूनच बंगालमध्ये अलीकडेच सुरू झालेल्यामहिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या योजना महत्त्वाच्याआहेत. त्यांचे महत्त्व बसचे तिकीट महाग आहे म्हणूननाही, तर भारतात महिलांसाठी घराबाहेर पडणे हे केवळ प्रवासाची गरज नसून एक भावनिक विषय आहे. आणि पाहायला गेले तर केवळ 40 रुपयेही लाखो महिलांसाठी कर्ज आणि सन्मान यांतील फरक ठरू शकतात. एखादी महिला घराबाहेर फक्त कामासाठीच पडतनाही. ती आत्मनिर्भरतेकडे आणि नव्या शक्यतांकडेही जात असते. कोणाची परवानगी न घेता या जगातस्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या दिशेने ती पावलेटाकत असते. कदाचित ती शहरभर दोन बस बदलूनसंधिवाताने त्रस्त असलेल्या आईची काळजीघेण्यासाठी जात असेल. कदाचित लग्नानंतर सोडूनदिलेल्या अभ्यासक्रमात तिने पुन्हा प्रवेश घेतला असेल.किंवा अधिक पगाराच्या नोकरीसाठी ती प्रवास करतअसेल. किंवा एखाद्या अत्याचारी पतीपासून दूर काहीक्षण शांततेत घालवण्यासाठी ती बहिणीकडे जातअसेल. तसेच ऑफिसनंतर फक्त काही क्षण शांततेचाअनुभव घेण्यासाठी समुद्रकिनारी बसली असेल. कारणघरी परतल्यावर सिंकमध्ये भरलेली भांडी तिची वाटपाहतच असतात आणि तेच तिचे विनावेतन कामअसते. अनेक पुरुषांना ही बाब समजत नाही. कारणभारतात सार्वजनिक जागा नेहमीच पुरुषांच्यामालकीच्या असल्यासारख्या मानल्या गेल्या आहेत. हेसर्वत्र दिसते. पुरुष संपूर्ण फूटपाथवर वाहने उभीकरतात. महिला मुलांच्या प्रॅमसह चालतात तिथे हीमंडळी बाईक चालवतात. शहरांच्या भिंतींनाहीअनेकांनी स्वतःच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयमानले आहे. रस्ते, रेल्वे स्थानके, पायऱ्या आणि कोपऱ्यांमध्ये तेकसलाही संकोच न बाळगता थुंकताना दिसतात.सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र पुरुषांच्या उपस्थितीचे ठसेदिसतात- ठळक, निःसंकोच आणि कोणत्याहीप्रश्नांशिवाय. तर महिलांना स्वतःला मर्यादित ठेवण्याचे,डोळ्यात डोळे न घालण्याचे आणि अंधार होण्यापूर्वीघरी परतण्याचे शिकवले जाते. मुंबईसारखी काही शहरे वगळता- येथे सार्वजनिकठिकाणी महिलांची उपस्थिती तुलनेने सामान्य मानलीजाते- आजही भारतातील बहुतेक शहरे सायंकाळीसहा-सातनंतर महिलांविना रिकामी होऊ लागतात.विशेषतः त्यांच्यासोबत पुरुष नसल्यास. रात्री एकटीमहिला दिसणे आजही असामान्य किंवा त्याहून वाईटम्हणजे एखाद्या निमंत्रणासारखे मानले जाते. म्हणूनच सरकार महिलांसाठी ‘पिंक तिकीट’ किंवामोफत बस प्रवासाच्या योजना सुरू करते, तेव्हा तीदानधर्माची बाब नसते. ती मोफत सुविधा नाही. तो एक छोटा, पण क्रांतिकारीसंदेश असतो की, महिलांनाही प्रवासाचा हक्क आहे.त्यांनाही शहरांमध्ये राहण्याचा आणि दिसण्याचाअधिकार आहे. मात्र, सुरक्षा केवळ तिकिटापुरतीमर्यादित असू शकत नाही. चांगल्या प्रकाशव्यवस्थेचेबसस्टॉप, सीसीटीव्ही, महिला वाहक, सुरक्षारक्षक,पॅनिक बटण आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विश्वासार्हसंपर्क व्यवस्थाही आवश्यक आहे. कारण अनेकदाएखाद्या महिलेसाठी सर्वात धोकादायक प्रवास म्हणजेबसस्टॉपपासून एकटीने घरी जाणे हा देखील असूशकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) एखाद्या शहराची प्रगती त्या शहरातमहिला किती निर्भयपणे आणि मुक्तपणेफिरू शकतात, यावर अवलंबून असते.त्यामुळे अनेक महिलांसाठी मोफत बसप्रवासासारख्या योजना भावनिकजिव्हाळ्याच्या ठरतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




