एका नामांकित खासगी शाळेत नऊ वर्षांच्या एकाचिमुरडीने सततचे चिडवणे आणि उपेक्षेला कंटाळूनआत्महत्या केली. मात्र, या घटनेला आठ महिने उलटूनगेल्यानंतरही प्राचार्या, वर्गशिक्षक किंवा व्यवस्थापनावरकोणतीही अंतर्गत कारवाई झालेली नाही. पोलिसांचीकारवाईही संथ गतीने सुरू असून आतापर्यंत कुणालाहीअटक करण्यात आलेली नाही. जयपूरमधील अमायराच्यामृत्यूची ही घटना आपल्याकडून संताप आणि आक्रोशाचीअपेक्षा करते. अमायराचे आई-वडील शिवानी आणिविजय मीना यांचा असा आरोप आहे की, शाळेचेव्यवस्थापन प्रभावशाली आणि राजकीय वरदहस्तअसलेले असल्यामुळे पोलिस या प्रकरणात मवाळभूमिका घेत आहेत. पोलिसांचा प्रयत्न त्यांच्याच मुलीवरखापर फोडण्याचा होता, असे त्यांचे म्हणणे आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने तर चक्क अमायरा ही भ्रमित होती, असेही म्हटले. परंतु, सीसीटीव्ही फुटेज मात्र यापेक्षापूर्णपणे वेगळेच चित्र समोर आणते. पहिले सीसीटीव्हीफुटेज नोव्हेंबर 2025 मध्ये समोर आले होते, जेव्हाअमायराने शाळेच्या इमारतीवरून चौथ्या मजल्यावरूनउडी मारून आपला जीव दिला होता. या अपघातापूर्वीअमायरा कित्येक महिन्यांपासून शाळेत तिची छेड काढलीजात असल्याची तक्रार करत होती. तिने एकदा थेटमुख्याध्यापकांकडेही याची तक्रार केली होती. आता याघटनेच्या काही महिन्यांनंतर, तिच्या कुटुंबीयांनी आठमिनिटांचे एक नवीन सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे.हे फुटेज अमायराच्या मृत्यूच्या आधीच्या शेवटच्या काहीमिनिटांचे अत्यंत गंभीर चित्र समोर आणते. या फुटेजमध्येएक विद्यार्थी डिजिटल पाटी काढून ती अमायरालादाखवताना दिसत आहे. इतर विद्यार्थीही तिलाचिडवण्यात सामील होतात. तिला जे दाखवण्यात आले,त्यात लैंगिक संकेत होते, असे अमायराच्या आईचे मानणेआहे. अमायरा तिच्या शिक्षिकेकडे एकदा नव्हे तर पाचवेळा जाते, पण प्रत्येक वेळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षकेले जाते. एका प्रसंगात तर शिक्षिका तिची मदतकरण्याऐवजी उलट तिलाच रागावताना दिसत आहे.फुटेजमध्ये ती मुलगी हात जोडून उभी आहे. ती आपलेतोंडही झाकताना दिसत आहे, जे ती अत्यंत मानसिकतणावात आणि दुःखात असल्याचे दर्शवते. ज्याविद्यार्थिनीने आपल्या वर्गमित्रांच्या वर्तनाची वारंवार तक्रारकेली होती, तिच्यावर शिक्षक विशेष लक्ष ठेवतील, अशीकिमान अपेक्षा तरी तुम्ही करू शकता. पण त्याऐवजी, तीमुलगी कुणाच्याही देखरेखीशिवाय वर्गाबाहेर निघून जाते.जेव्हा ती एकटी पायऱ्या चढते, तेव्हा ती मुलगी कुठे जातआहे आणि का, असा प्रश्न कुणाच्याही मनात येत नाही.उंचीची भीती वाटणारी ती मुलगी इमारतीवर जाऊन बसतेआणि सुमारे 48 फूट खाली उडी मारते. एवढे महिनेउलटून गेल्यानंतरही अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरेमिळालेली नाहीत. जसे की, त्या डिजिटल पाटीवर नक्कीकाय होते? शिक्षिकेने हस्तक्षेप का केला नाही? ती मुलगीएकटीच बाहेर कशी गेली? ती कुणाच्याहीदेखरेखीशिवाय शाळेच्या कॉरिडॉरमध्ये (सज्जा)एकटीच कशी फिरत राहिली? सीबीएसईच्या सत्यशोधकसमितीने म्हटले होते की, अमायराचा मृत्यू टाळता आलाअसता आणि शाळा योग्य वेळी हस्तक्षेप करण्यातअपयशी ठरली. समितीला असेही आढळले की, मुलगीज्या ठिकाणी पडली ती जागा फॉरेन्सिक पुराव्यांसाठीमहत्त्वाची असतानाही, शाळेने घाईघाईने ती जागा स्वच्छकरून घेतली. या प्रकरणाचा तपास करणारे 3 अधिकारीहीआतापर्यंत बदलण्यात आले आहेत. शिवानी आणि विजययांनी मला सांगितले की, न्यायाची ही लढाई सुरूकेल्यापासून एक तर त्यांच्याच मुलीला दोषी ठरवले जातआहे किंवा मग त्यांना. शिवानी या नोकरी करणाऱ्या आईहोत्या आणि त्यांनी आपल्या मुलीकडे दुर्लक्ष केले, असाआरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला. अमायराचा हादुःखद मृत्यू म्हणजे छळ, संवेदनहीनता आणि संस्थात्मकपातळीवर पद्धतशीरपणे केलेली लपवाछपवी याची एककहाणी आहे. उद्या तिच्या जागी तुमचीही मुलगी असूशकते! (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) कुणाच्याही मनात हा प्रश्न आला नाही कीती मुलगी वर्गाबाहेर कुठे व का जातआहे? उंचीची भीती वाटणारी ती चिमुरडी48 फूट उंचावरून खाली उडी मारते. त्याडिजिटल पाटीवर असे काय होते?
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



