पुणे : मानवी उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालावी

लोणी काळभोर : राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे. मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाचा एकत्रिकरणातून शिक्षण प्रदान करावे तसे भगवतगीतेमध्ये सुद्धा ही शिकवण दिली आहे. असे झाल्यास स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्या प्रमाणे २१ व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मांडले.येथील माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती घुमटाचा विश्वार्पण, श्रीमद् भगवद्गीता ज्ञान भवनाचा लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते श्रीमद भगवदगीतेच्या सव्वा लाख प्रती विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.

यावेळी संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. स्वाती चाटे कराड, डॉ. सुचित्रा नागरे- कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. आर. एम चिटणीस आणि डॉ. मिलिंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यापुढे बोलताना म्हणाले, " विदयार्थ्यांनी आध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात मग्न रहावे. डॉ. विश्वनाथ कराड विश्वशांती संदेश देत आहेत, तर दुसरीकडे या यज्ञाच्या रक्षणासाठी धर्नुधारी अर्जुनाची गरज आहे. साधू-संतांच्या त्यागाने भारतीय संस्कृती अमर आहे. नव्या युगात विज्ञान आणि आध्यात्माचा योग व्हावा.विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्र यावे. धर्माचे तत्व सांगणारा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *