पुणे : कोथरुडमध्ये मोटारचालकाची मुजोरी; दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण

पुणे : कोथरुडमध्ये मोटारचालक तसेच साथीदारांनी किरकोळ कारणावरुन दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मोटारचालकासह त्याच्या बरोबर असलेल्या चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत दुचाकीस्वार अमन भिडे (वय २२, रा. परमहंसनगर, काेथरुड) याला दुखापत झाली आहे. भिडेने याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अमन भिडे कोथरुडमधील अजंठा अॅव्हेन्यू  इमारतीसमोरुन जात होता. त्या वेळी मोटारचालकाने जोरात हॅार्न वाजविला. तेव्हा भिडेने मोटारीला जाण्यास जागा दिली. दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि रस्ता खूप मोठा आहे, असे भिडेने मोटारचालकाला सांगितले.

या कारणावरुन मोटारचालक आणि त्याच्या बरोबर असलेले साथीदार चिडले. त्यांनी भिडेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. भिडेला मारहाण करुन मोटारीतील टोळक्याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मोटारचालक आणि साथीदार तेथून पसार झाले. घाबरलेल्या भिडेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे तपास करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *