पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:एआय सक्रिय होवो आयुष्यात,‎ पण लाचार होता कामा नये

श्रीरामांनी युद्धापूर्वी अंगदला दूत बनवून रावणाकडे पाठवले, तेव्हा ‎त्यांनी एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली होती - अंगदा, रावणाशी ‎तुझे वर्तन असे असावे की ‘काजू हमार तासु हित होई.’ आपलेही काम ‎व्हावे आणि त्याचेही भले व्हावे. आता आपण एआयच्या युगात या‎ओळीचा अर्थ समजून तो आयुष्यात उतरवायला हवा. एआयही‎ आयुष्यात सक्रिय असावा पण आपण लाचारही होता कामा नये.‎ आपण कधी खावे, कधी स्नान करावे, याचाही निर्णय एआयने घेऊ‎ नये. व्यवस्थापनाच्या भाषेत याला परस्पर वृद्धी म्हणतात - म्युच्युअल ॲम्प्लिफिकेशन म्हणजे दोघांचाही फायदा व्हावा. यंत्राचाही फायदा ‎व्हावा आणि ते वापरणाऱ्या माणसाचाही. एआयच्या आधी आपल्या‎ येथे एक लाट आली होती. तिला तज्ज्ञतेची लाट म्हणत. प्रत्येक क्षेत्रात‎ लोक तज्ज्ञ होत होते. आता हा एआय तज्ज्ञतेवर मोठा हल्ला करेल.‎कारण तज्ज्ञ होण्यासाठी मेहनत आणि संघर्ष करावा लागत होता. तो‎ आता थांबेल. आणि आपण विचार करण्याच्या बाबतीत आत्मसमर्पण‎ करून बसू नये. एआयसमोर इतकी काळजी नक्की घ्या.‎‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *