पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धर्म योग्य अर्थाने समजून तो‎ जीवनात उतरवणे गरजेचे

सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राजकारणच दिसते. नैतिकता जणू‎कुठेतरी संपूनच गेली आहे. राजकारणाने धर्मात प्रवेश करून सर्वात‎जास्त नुकसान केले आहे. धर्माच्या राजकारणात तीन प्रकारचे लोक‎आले. एक होते पुरोगामी. त्यांनी धर्माचा थोडाफार सदुपयोग केला, पण‎आपल्या स्वार्थासाठी अतिशय सावधगिरीने त्याचा दुरुपयोगही केला.‎दुसरे होते परंपरावादी. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक‎डोळेझाक केली. त्यामुळे धर्माचे नुकसान झाले. नंतर राजकारणी‎मंडळींनी तर कोणतीही कसर सोडलीच नाही. म्हणूनच आजच्या तरुण‎मुलांमध्ये धर्माबद्दल उदासीनता आली आहे. जे खरे साधू-संत होते, ते‎तटस्थ राहिले. हळूहळू हे राजकारण वाढत गेले. घराघरात पोहोचले.‎पती-पत्नी एकमेकांशी राजकारण करतात, हे समजू शकते, कारण या‎नात्यात सर्वाधिक अपेक्षा असतात. पण आता आई-वडील आणि‎मुलांमध्येही राजकारण सुरू आहे. आपला स्वार्थ साधा आणि‎समोरच्याला बाजूला करा. राजकारणाची अशी परिस्थिती कुटुंबासाठी‎अत्यंत घातक आहे. या सर्वांवर एकच मार्ग आहे - धर्म योग्य अर्थाने‎समजून घ्यावा आणि तो जीवनात उतरावा.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *