तृणमूल काँग्रेसमधील धक्कादायक फूट ही बंगालपेक्षा दिल्लीत भाजपला बळकटी देण्याशी अधिक संबंधित असल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या उलट तेथे 2022 मध्ये शिवसेनेतील फूट व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन सरकार स्थापनेसाठी आवश्यक होते. तशी परिस्थिती बंगालमध्ये नव्हती. येथे भाजपने आधीच स्वतः बळावर दोन-तृतीयांश बहुमत मिळवले होते. तरीही तृणमूलमधील विघटन पराभवानंतर अवघ्या काही तासांत सुरू झाले. पाहता पाहता राज्य विधानसभेतील तृणमूलच्या दोन-तृतीयांश आमदारांनी वेगळे होत ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर गट स्थापन केला. त्यांनी आपणच खरे तृणमूल असल्याचा दावा केला. विधानसभा अध्यक्षांनीही त्यांना विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली. यानंतर लोकसभेतील तृणमूलच्या 20 खासदार अर्थात पक्षाच्या एकूण 28 खासदारांपैकी दोन-तृतीयांश सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांशी संपर्क साधून आपण नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन झाल्याची माहिती दिली. दहाव्या अनुसूचीतील दोन-तृतीयांश सदस्यसंख्या व विलीनीकरणाच्या तरतुदींचा उद्देश पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत संसद सदस्यत्व रद्द होण्यापासून संरक्षण मिळवणे हा होता. या 20 खासदारांचे विलीनीकरण अशा एका पक्षात झाले. त्याचे नाव यापूर्वी कोणी ऐकलेही नव्हते. एनसीपीआय हा त्रिपुरातील एक छोटा, नोंदणीकृत पण मान्यता नसलेला पक्ष आहे. 2023 मध्ये स्थापन या पक्षाने राज्य विधानसभा निवडणूक लढवली होती व त्याला एकूण मिळून 1,200 पेक्षाही कमी मते मिळाली होती. विशेष म्हणजे तृणमूलच्या 20 बंडखोर खासदारांनी भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारला नाही. मात्र या गटाचे नेतृत्व करणाऱ्या काकोली घोष दस्तीदार यांनी ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) पाठिंबा देतील, हे स्पष्ट केले. काही आठवड्यांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच पक्षाच्या खासदारांना आपल्या गटात सामावून घेतल्याने निर्माण होणाऱ्या नाराजीला सामोरे जावे लागू नये, अशी भाजपची भूमिका असू शकते. तरीही लोकसभेत महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी भाजप त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवत असल्याचे दिसते.राज्यसभेतील तृणमूलच्या बंडखोरांची रणनीती मात्रवेगळी दिसते. तीन खासदारांनी सभागृहाचे व पक्षाच्याप्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे दिले. जुलैमध्ये संसदेचेपावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर लोकसभा वराज्यसभेतील चित्र वेगळे दिसू शकते. महिला आरक्षण विधेयक व मतदारसंघ पुनर्रचनाविधेयके मंजूर करण्यासाठी भाजप दोन्ही सभागृहांतदोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करतअसल्याचे आता स्पष्ट होत आहे. ही विधेयके यावर्षीएप्रिलमध्ये मंजूर होऊ शकली नव्हती. सत्ताधारी पक्ष हीसंख्या गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.तृणमूलमधील फूट पडण्यापूर्वी दिल्लीतील केंद्रीय मंत्रीभूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पक्षाच्या बंडखोरखासदारांच्या अनेक बैठका झाल्या. तृणमूलमधील फूट ही एखादी वेगळी घटना नाही.महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)देखील आणखी एका विभाजनाच्या उंबरठ्यावर उभीदिसते. अलीकडील विधानसभा निवडणुकांत पराभूतद्रमुकने भाजपने वेगळी रणनीती स्वीकारली. द्रमुकसलासोबत घेण्यासाठी सरकार या विधेयकांमध्ये बदलकरण्याच्या तयारीत आहे. द्रमुकने आपल्या 22लोकसभा जागांसह भाजपला पाठिंबा दिला तर तीभाजपसाठी मोठी राजकीय कामगिरी ठरेल. त्याततृणमूलचे 20 खासदार व संभाव्य शिवसेनेचे 7खासदारही सहभागी झाले. तसेच मतदानावेळीअनुपस्थित राहणारे, मतदानापासून दूर राहणारे व इतरसदस्य मिळाल्यास भाजप अपेक्षित संख्येपर्यंत पोहोचूशकतो. 1977 मध्ये बंगालमध्ये डाव्या आघाडीची सत्ताआल्यानंतर काँग्रेस पक्ष दुय्यम ठरला होता. 2011 मध्येममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर डाव्याआघाडीसमोरही अस्तित्वाचे संकट निर्माण झाले.तरीही दोन्ही पक्षांचे तृणमूलप्रमाणे विघटन झाले नव्हते.आज आपण प्रादेशिक पक्षांमध्ये बनत चालला आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) आज आपण प्रादेशिक पक्षांमध्ये अशा प्रकारचा अंतर्गत स्फोट पाहत आहोत, जो यापूर्वी कधीच दिसला नव्हता. राजकारण झपाट्याने बदलत आहे. पक्षांमध्ये फूट पाडून बहुमत मिळवणे आता नवा सामान्य नियम बनत चालला आहे. तृणमूल काँग्रेस हे त्याचेच उदाहरण आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: आळंदीत उभे राहणार अत्याधुनिक 'मेगा टर्मिनल', रेल्वे प्रवासाचा कायापालट होणार!
- बेट भागातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी खपवून घेणार नाही; पाणीटंचाईवर युद्धपातळीवर उपाययोजना करा - आमदार दिलीप वळसे पाटील.
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- पुणे: आळंदीत उभे राहणार अत्याधुनिक 'मेगा टर्मिनल', रेल्वे प्रवासाचा कायापालट होणार!
- बेट भागातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी खपवून घेणार नाही; पाणीटंचाईवर युद्धपातळीवर उपाययोजना करा - आमदार दिलीप वळसे पाटील.
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
गुन्हा
- पुणे: हिरे व्यापाऱ्याचे 'मृत्यू'चे नाटक उघड; पत्नीला केलेल्या एका फोनमुळे फुटलं बिंग!
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- पोलिसांवर गोळीबार करून पळालेल्या कुख्यात गुंडाचा खेळ खल्लास; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० गुन्हे असलेल्या आरोपीला बेड्या.
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
राजकीय
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
- बंगालमधील राजकीय संघर्ष पेटला! भवानीपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ममता बॅनर्जींचे कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान.
इतर
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- गुजरात: भीषण अपघात! वडोदरा-हालोल मार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- राजौरीतील सीमेवर भीषण स्फोट; नियमित गस्तीदरम्यान भूसुरुंग सक्रिय झाल्याने ४ जवान जखमी.
- धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!























Subscribe to my channel



