नंदितेश निलय यांचा कॉलम:वयाच्या 85 व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याचे मोल वेगळेच असते‎

‎‎‎‎‎‎‎‎नोबेल पुरस्कारांची घोषणा होताच एक सकारात्मक‎ऊर्जा आपल्याभोवती दाटून येते, असे तुम्हालाही वाटते‎का? मला तरी नक्कीच तसे वाटते. आणि तसे का वाटू नये‎बरे! रील्सच्या दुनियेत हरवून गेलेल्या जगाला साहित्याच्या‎पुरस्काराची चाहूल लागते, तेव्हा त्याचे लक्ष तिकडे वेधले‎जाते. डिजिटल साधनांच्या आधाराशिवायही माणूस‎मानवी संवेदना अनुभवू शकतो, असा विश्वास त्यातून‎जागा होतो. असो, आज चर्चा करूया शांततेच्या‎पुरस्काराची.‎ होय, शांततेचा पुरस्कार! कारण आज जगात व्यक्ती,‎नेतृत्व किंवा संस्था असे कुणीही उरलेले नाही, जे या ड्रोन,‎क्षेपणास्त्रे आणि विद्वेषाने भरलेल्या मनांपर्यंत शांततेचा‎आवाज जागतिक स्तरावर पोहोचवू शकेल. पण नोबेल ते‎नोबेलच! त्याला ना वाढते वय दिसले, ना जात, धर्म, वर्ण,‎लिंग किंवा एखाद्या देशाची लष्करी व आर्थिक ताकद. या‎समितीने यंदा शांततेच्या पुरस्कारासाठी भारतीय तमिळ‎वंशाच्या 85 वर्षांच्या एका दक्षिण आफ्रिकी महिलेची निवड‎केली.आपल्या देशात 85 वर्षांचे असणे म्हणजे काय, याचा‎विचार करा. आपल्या आजूबाजूचे लोक या वयात‎पोहोचलेल्या व्यक्तीला कसा वागवतात? पण त्या आहेत‎नवी पिल्लई! वर्णभेदविरोधी कैद्यांचा बचाव करण्यापासून‎तर जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय न्यायालये आणि‎मानवाधिकार संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. वय, वर्ण‎किंवा गरिबी यांपैकी कशालाही त्यांनी आपल्या मार्गात‎अडथळा ठरू दिले नाही. तसेच त्यांचे कर्तृत्व‎ओळखण्यापासून नोबेल समितीलाही कुणी रोखू शकले‎नाही. 19४1 मध्ये डर्बनच्या क्लेअरवूड येथील एका गरीब‎तमिळ कुटुंबात जन्मलेल्या नवी पिल्लई या वर्णद्वेषाच्या‎वातावरणात वाढल्या. हार्वर्डमधून कायद्यात डॉक्टरेट‎मिळवणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आफ्रिकी व्यक्ती ठरल्या.‎तरीही कोणतीही कायदेविषयक फर्म त्यांना नोकरी देण्यास‎तयार नव्हती. कारण गोऱ्या महिला सेक्रेटरींना कोणत्याही‎कृष्णवर्णीय महिलेकडून सूचना घेणे मान्य नव्हते. मग त्यांनी‎स्वतःची वकिली सुरू केली. नतालमध्ये अशी प्रॅक्टिस सुरू‎करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या.‎ त्यांनी वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यांची बाजू मांडली.‎नजरकैदेतील लोकांवर होणारे अत्याचार आणि‎एकांतवासातील छळाच्या घटना त्यांनी चव्हाट्यावर‎आणल्या. त्यांनी लढवलेला एक खटला जिंकल्यामुळे‎रॉबेन बेटावरील राजकीय कैद्यांना कायद्याच्या पुस्तकांचा‎आधार मिळाला; ज्या कैद्यांमध्ये नेल्सन मंडेला यांचाही‎समावेश होता. नॉर्वेजियन नोबेल समितीने आवर्जून नमूद‎केले की, वाढती युद्धे आणि ‘सत्यापेक्षा ताकदीला महत्त्व’‎देण्याच्या आजच्या प्रवृत्तीत हा पुरस्कार एक गोष्ट‎अधोरेखित करतो-ती म्हणजे, खरी व शाश्वत शांतता ही‎केवळ ताकदीवर नव्हे, तर कायदेशीर तत्त्वांवर आणि‎जबाबदारीवरच टिकून राहते.‎ नवी पिल्लई यांचे भारताशी घट्ट नाते आहे. त्यांच्या‎वडिलांचे कुटुंब मूळचे तमिळनाडूतील दिंडीगुल‎जिल्ह्यातील वथलागुंडू येथील होते. 1890 च्या दशकात‎त्यांचे आजी-आजोबा मद्रास प्रेसिडेन्सीमधून नतालमधील‎उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी करारबद्ध मजूर म्हणून‎गेले होते. या खडतर संघर्षात त्यांच्या आजोबांचे पायही‎गेले. त्यांचे वडील बसचालक होते, पण त्यांनी मुलांप्रमाणेच‎मुलींच्या शिक्षणावरही भर दिला. वडिलांच्या निधनानंतर‎त्यांनी तमिळनाडूत जाऊन आपल्या हयात असलेल्या‎नातेवाइकांचा शोध घेतला. त्याचबरोबर त्यांनी द्वेष आणि‎युद्धात हरवून गेलेल्या त्या शांततेचाही सातत्याने शोध‎घेतला, ज्या शांततेची आज जगाला सर्वात जास्त गरज‎आहे. शांततेची भाषा करणारे प्रत्येक नेतृत्व आज नवी‎पिल्लई यांच्या सोबतीने या नोबेल पुरस्काराचे तेज नक्कीच‎अनुभवू शकते!‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *