China Oil Import : काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक असा अंतरिम व्यापार करार झाला. या व्यापार कराराअंतर्गत भारत आणि अमेरिका यांच्यात कृषी, उद्योग तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांच्या व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन्ही देशांनी व्यापारात एकमेकांना अनेक पातळ्यांवर सूट दिलेली आहे. हा करार करताना मात्र अमेरिकेकडून वेगवेगळे दावे करण्यात आलेले आहेत. हा करार करताना भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचे मान्य केलेले आहे, असे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. असे असतानाच चीनने आपला डाव साधला आहे. रशियासोबत आपला तेल व्यापार वाढवण्यासाठी चीनकडून प्रयत्न केले जात आहेत.
अमेरिका नेमका काय दावा करत आहे?
भारत-अमेरिका यांच्यातील अंतरिम करार घडवून आणण्यासाठी भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा प्रस्ताव मान्य केलेला आहे, असे अमेरिकेकडून उघडपणे सांगितले जात आहे. भारताने मात्र आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे कुठेही सांगितलेले नाही. आमची इंधनाची गरज आणि सुलभता लक्षात घेऊनच आम्ही भविष्यातील निर्णय घेऊ, अशी भूमिका भारताने घेतलेली आहे. दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार भारताने मात्र सरकारी तेल कंपन्यांना अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीला प्राधान्य द्या, असे अनौपचारिकरित्या सांगितलेले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना मात्र चीनने रशियासोबत सलगी वाढवलेली आहे. चीनकडून सवलतीत दिले जात अससलेले तेल मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे.
चीनने तेल खरेदी किती वाढवली?
चीनने रशियाकडून रेकॉर्डब्रेक तेल खरेदी केली आहे. व्यापारी आणि जहाज ट्रॅकिंगच्या डेटानुसार भारताने रशियाकडील तेल खरेदी कमी केल्यानंतर आता चीनने सलग तिसऱ्या महिन्यात आपली तेल खरेदी वाढवलेली आहे. वॉर्टेक्सा अॅनालिटिक्सच्या सुरुवातीच्या अभ्यासानुसार फेब्रुवारी महिन्यात रशियाकडून चीनला 20 लाख रुपये प्रतिबॅरल एवढी कच्च्या तेल्याची निर्यात केली जाऊ शकते. जानेवारी महिन्यात हे प्रमाण 17 लाख बॅरल प्रति दिन एवढी होती. केप्लरच्या अंतरिम आकड्यांनुसार चीनने रशियाकडून फेब्रुवारी महिन्यात साधारण 20.83 लाख बॅरल प्रति दीन एवढी खरेदी केली आहे. हीच खरेदी जानेवारी महिन्यात 17.18 लाख बॅरल प्रति दिन एवढी होती. रशियाला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आलेला आहे. अंतरिम व्यापार करार झाल्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे. परंतु आता भारताचा शत्रू मानला जाणारा चीन देश तेल खरेदी वाढवून एका प्रकारे रशियाच्या मदतीला धावून आला आहे. दरम्यान, आता चीन रशियाकडून तेल खरेदीद वाढ करत असल्याने भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




