घोडेगाव (ता आंबेगाव) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार (दि. १४) पासुन नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे किंवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांची गैरसोय होऊन आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. मार्च महिन्याचा इन होत असल्याने कर्जदाराला याचा विशेष फटका बसला आहे. खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
दरम्यान सोमवार (दि. १४) पासुन दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम संथगतिने सुरू आहे. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर काहींना दस्त नोंदणीसाठी दोन ते तीन दिवस हेलपाटे मारावे लागत आहे. यामध्ये विषेशतः जेष्ठ ७५ ते ८० वयोेगटातील महिला व पुरूषांचे हाल होत आहे. दरवर्षी मार्च महिन्यात ही समस्या उद्भवली जात आहे. शासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
आंबेगाव तालुक्यात मोठया संख्येने सदनिकांचे खरेदी विक्री होत आहे. तसेच दुकाने, जमीन खरेदी विक्री, भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्युपत्र आदि कामांसाठी नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणक प्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठी तांत्रिक सहकार्य हे एनआयसीकडून दिले जाते.
राज्याला महसूल देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग दुस-या क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी हजारो कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजारीत जमा होतो. या विभागाकडे शासनाने दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलामध्ये दरवर्षी प्रमाणे वाढ होत असल्याने तसेच मार्च महिन्यात विविध बॅंका, पतसंस्था यांच्याकडे कर्जप्रकरण करण्यासाठी गहाणखत करावे लागत असल्याने त्यांचीही गर्दी होत आहे.
सर्व्हर कनेक्टिव्हिटी सुरळीत करण्याची मागणी पक्षकार ,वकील आणि नागरिक करत आहे. उद्या ही व्यवस्था सुरळीत न झाल्यास कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी दिला आहे.
आंबेगाव चे दुय्यम निबंधक अधिकारी एस. एस. वाव्हळ म्हणाले,
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रणालीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाला आहे. एकच सर्व्हर असल्याने राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात समस्या आहे. वरिष्ठस्तरावर हा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकर ही प्रणाली सुरळीत होईल.हे पण वाचा-
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




