ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर रिलीज झालेली हॉरर वेब सीरिज भय: द गौरव तिवारी मिस्ट्री सध्या प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. ही सीरिज भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल तज्ज्ञ गौरव तिवारी यांच्या खऱ्या आयुष्यावर आणि त्यांच्या रहस्यमयी मृत्यूवर आधारित आहे. खऱ्या घटनेवर आधारित ही कथा फक्त भय निर्माण करत नाही, तर प्रत्येक टप्प्यावर विचार करायला भाग पाडते. रिलीज झाल्यापासून ‘भय’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हॉरर पाहायला आवडणारे चाहते ती बिंज-वॉच करत आहेत. अलीकडेच रिलीज झालेल्या या सीरिजने लोकांना खरंच भयभीत केले आहे. तसेच क्रिटिक्सकडूनही या सीरिजला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत.
मृतदेहगृहापासून सुरू होणारी कथा, जी अंगावर काटा आणते
सीरिजची सुरुवात एका थरारक शवगृहाच्या दृश्याने होते. तिथे गौरव तिवारी यांचे पोस्टमॉर्टेम सुरू असते. सुरुवातीला पोलिस ही आत्महत्या समजतात, पण त्या्ंच्या गळ्यावरील विचित्र खुणा कथेला वेगळे वळण देते. तेव्हा एका लेखिकेची एन्ट्री होते, जी गौरव यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्यास सुरुवात करते आणि कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते. येथे प्रेक्षक पाहतात की, पायलट होण्याचे स्वप्न पाहणारा तरुण कसा पॅरानॉर्मल जगाच्या गहनतेत उतरतो.
रहस्यमयी मृत्यू आणि अनुत्तरित प्रश्न
फ्लॅशबॅकमध्ये दाखवले जाते की, गौरव पायलट होण्याचे स्वप्न पाहत होते. पण एक दिवशी विमान उडवताना त्यांच्यासोबत काहीतरी असामान्य घडते आणि ते पॅरानॉर्मल तज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतात. या काळात ते इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीत सामील होतात, जिथे त्यांच्यासोबत तीन इतर लोक काम करतात. सुरुवातीला सर्व काही ठीक असते, पण पाच वर्षांनंतर त्यांच्यासोबत विचित्र घटना घडू लागतात आणि शेवटी रहस्यमयी पद्धतीने गौरव यांचा मृत्यू होतो. ‘भय’ सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवते. सीरिजमध्ये असे अनेक सीन आहेत जे पाहून तुमच्या अंगावर काटे येतील.
उत्तम अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शन
सीरिजमध्ये करण टॅकर यांनी गौरव तिवारी यांच्या भूमिका जीवंत केली आहे आणि त्यांचा गंभीर अंदाज कथेला मजबूत बनवतो. त्यांच्यासोबत कल्कि कोचलिन, सलोनी बत्रा, दानिश सूद, शुभम चौधरी आणि निमिशा नायर महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी रॉबी ग्रेवाल यांनी सांभाळली आहे, ज्यांनी भय आणि सस्पेंसला वेगळ्या पद्धतीने सादर केले आहे. १२ डिसेंबर रोजी रिलीज झालेली ही सीरिज हॉरर प्रेमींसाठी ओटीटीवर एक उत्तम ट्रीट आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




