
Nagpur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूरच्या गणेशपेठ येथील कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात झालेल्या लावणीच्या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही वेळातच कार्यक्रमातील लावणीचे दृश्य मोबाईलवर रेकॉर्ड होऊन सोशल मीडियावर पसरले आणि त्यानंतर या कार्यक्रमावर राजकीय चर्चांना उधाण आले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना आणि नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी शिल्पा शाहीर यांनी लावणीचे सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही तरुण कार्यकर्त्यांनी “वन्स मोर”च्या घोषणा दिल्यानंतर शिल्पा शाहीर यांनी पुन्हा एकदा सादरीकरण केले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ काही उपस्थितांनी मोबाईलवर टिपला आणि सोशल मीडियावर तो झपाट्याने व्हायरल झाला.
|
Pune : गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय; जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द |
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ताकसाडे यांनी सांगितले की, “हा कार्यक्रम पूर्णपणे सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेला होता. शिल्पा शाहीर या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी असून, त्यांनी पारंपरिक लावणी सादर केली. कार्यक्रमात महिला आणि पुरुष कार्यकर्ता दोघेही उपस्थित होते आणि हे सर्व एक पारिवारिक वातावरणात पार पडले.”
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, “लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. तिचा अवमान होऊ नये आणि तिचा चुकीचा अर्थ लावू नये. आम्ही दिवाळीचा उत्सव आनंदाने साजरा केला, मात्र काही जणांनी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.” दरम्यान, शिल्पा शाहीर या नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष असून, त्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाले असले तरी पक्षाने हा कार्यक्रम कौटुंबिक दिवाळी स्नेहमिलन” असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहर
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
- पुणे: लाडक्या बाप्पा आणि दुर्गादेवीच्या सन्मानपूर्वक पुनर्विसर्जनासाठी महापालिका घेणार खाण भाडेतत्त्वावर!
महाराष्ट्र
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- पुणे: सोनकिरणांनी घेतले भुलेश्वराचे अलौकिक दर्शन! सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडताच मंदिर परिसरात दुमदुमले 'हर हर महादेव'चे गजर!
- मुंबई: आता बास झालं, नाहीतर आम्हालाही कायदेशीर पावले उचलावी लागतील; दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सज्जड दम!
- बीड: पुणे कनेक्शन अखेर सुरू! बीड ते थेट पुणे रेल्वे सेवा सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पूर्ण केला अजितदादांचा शब्द!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान


























Subscribe to my channel




