एन. रघुरामन यांचा कॉलम:स्पष्टता ही गुंतवणूक अन् बचतीचा आधार असायला हवा

21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील गावसकर (सनी), इयान बिशप, इयॉन मॉर्गन यांसारख्या दिग्गजांची मांदियाळी होती. ब्रॉडकास्टिंगच्या सध्याच्या काळात समालोचकांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी जाहिरातींना खेळाशी सहजपणे जोडून द्यावे. याच दरम्यान ‘रुपे’ कार्डचा प्रचार करताना एका समालोचकाने गावसकर यांच्याकडे वळून म्हटले, ‘सनीकडे एक कार्ड तर नक्कीच असेल.’ सनी फक्त हसले. समालोचकाने अधिक खोदून विचारले की कदाचित दोन असतील. जेव्हा अंदाज वाढून तीनपर्यंत पोहोचला, तेव्हा सनी यांनी ‘शून्य’चा इशारा केला. या घटनेने मला गेल्या आयपीएल हंगामातील वैयक्तिक आठवण करून दिली, जेव्हा मी सनी यांच्यासोबत प्रवास करत होतो. जसे आम्ही मुंबई विमानतळाच्या लाउंजमध्ये गेलो, मी माझे कार्ड स्वाइप केले. पण आमच्या समूहातील एका दुसऱ्या सदस्याला सनी यांच्यासाठी कार्ड स्वाइप करावे लागले कारण त्यांच्याकडे कोणतेही क्रेडिट कार्ड नव्हते. त्यांचा हा निर्णय पैशांची कमतरता किंवा खर्च न करण्याची इच्छा यामुळे नाही तर तो फायनान्शियल प्रॉडक्ट्ससोबतच्या त्यांच्या संबंधांची पूर्ण स्पष्टता दर्शवतो. मला ही घटना काही दिवसांपूर्वी तेव्हा आठवली जेव्हा मी एक आकडेवारी पाहिली. निवा बुपाच्या सर्वेक्षणानुसार, हेल्थ इन्शुरन्स खरेदी करणारे 55% युवक (24-34 वर्षे) पहिल्या तीन वर्षांच्या आत पॉलिसी बंद करून टाकतात. हे सांगते की विमा खरेदी करण्याचा निर्णय अनेकदा जोखीम व्यवस्थापनाच्या दीर्घकालीन समजाऐवजी अल्पकालीन कारणांमुळे घेतला जातो. पॉलिसी बंद करणाऱ्या जवळपास 46% युवकांनी याचे कारण खर्चाचा बोजा सहन न होणे हे सांगितले. हे कारण रास्तही आहे. यापैकी 66% लोकांवर आधीपासूनच पर्सनल किंवा होम लोनसारखी कर्जे होती. ही तरुण पिढी एका कटू वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहे. ते म्हणजे हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आणि हृदयविकार आता 50% लोकसंख्येला प्रभावित करत आहेत. एक दशकापूर्वी हा आकडा 31% होता. रुग्णालयात दाखल होण्याचा सरासरी खर्च 2017-18 मधील रुपये 20,135 वरून वाढून आज रुपये 34,064 झाला आहे. या तरुणांना कोण समजावणार की पॉलिसी लॅप्स होऊ देऊन त्यांनी आपली तीन वर्षांची गुंतवणूक शून्य केली आहे? लक्षात ठेवा, ते ज्या हाय-प्रेशर कॉर्पोरेट लाइफमध्ये जगत आहेत, ती जीवनशैलीशी संबंधित आजारांना निमंत्रण देते. मॅनेजमेंट टिप: हेल्थ इन्शुरन्स ही खर्चातील कपात नसून गुंतवणुकीची पहिली प्राथमिकता असायला हवी. पैशांसोबतचे तुमचे नाते नेहमी स्पष्टता आणि योग्य समजाच्या पायावर टिकलेले असावे, मग तो विमा असो, बचत असो वा गुंतवणूक.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

3 thoughts on “एन. रघुरामन यांचा कॉलम:स्पष्टता ही गुंतवणूक अन् बचतीचा आधार असायला हवा”

  1. I know this if offf topic butt I’m looking into starting my own blo
    and wwas wondering whuat all is neededd too gget set up?
    I’m assuming having a blolg like yours would cosst a pretty penny?
    I’m not very imternet smartt soo I’m nott 100% certain. Any suggestions or
    advice wouyld be greatloy appreciated. Cheers xnxx

    Feel freee tto visit my web-site – homepage [casting.xvideoszone.cc]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *