आज जगभरातील लोकांचे आयुष्य स्क्रीनपुरते मर्यादित झाले आहे. अशा या आधुनिक समाजात सर्वात दुर्मिळ गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे ‘मित्र’. सध्या एकटेपणा ही अनेकांसाठी लाजेची गोपनीय गोष्ट बनली आहे. त्यामुळेच अनेक जण हजारो अनोळखी लोकांसमोर आपले एकाकीपण उघडपणे व्यक्त करतात. यामागचा उद्देश एकच-कुणीतरी मित्रासारखी वेळ घालवेल, अशी अपेक्षा असते. एका जाहिरातीत लिहिले होते, “मी या एकटेपणाला कंटाळलो आहे. हे ऐकायला थोडे दुःखाचे वाटू शकते. पण मला खरोखरच काही नवीन मित्र बनवायचे आहेत.’ अमेरिकेत असे शेकडो लोक जाहिरातींच्या माध्यमातून भावना मोकळेपणाने मांडतात. कोणताही रोमँटिक हेतू न ठेवता त्यांना निव्वळ एक चांगले नाते हवे आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘सेंटर फॉर फ्रेंडशिप रिसर्च’ च्या संचालक जॅमी क्रेम्स म्हणाल्या, अशा प्रकारे मदतीची हाक मारणे म्हणजे स्वतःच्या मैत्रीची ‘टॅक्सी लाइट’ ऑन करण्यासारखे आहे. हे लोकांचे स्वतःच्या एकटेपणाबाबतचे प्रामाणिकपण दाखवते. वैमानिक क्षेत्रात ‘टॅक्सी लाइट’ हा शब्द वापरला जातो. धावपट्टीवर निळ्या रंगाचे दिवे असतात. ते विमानाला सुरक्षितपणे जमिनीवर उतरण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे अनेक लोकांना आपल्या आयुष्याचेही सुरक्षित लँडिंग हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. क्रेम्स पुढे म्हणाले, “मैत्री हे एखादे औषध असते, तर डॉक्टरांनी रुग्णांना सर्वात जास्त हेच औषध लिहून दिले असते.’ प्रौढ वयातील मैत्रीवर अभ्यास करणाऱ्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मिरियम किर्मायर म्हणाल्या, ऑनलाइन मित्र बनवण्यासाठी काही तंत्रांची गरज असते. तुमची गरज स्पष्टपणे सांगा. उदा. मला दर शुक्रवारी जिममध्ये सोबत येण्यासाठी एका मित्राची गरज आहे.’ त्यामुळेच आज ‘टिकटॉक’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘फ्रेंडशिप ॲप्लिकेशन’ उपलब्ध आहेत. 33 वर्षांच्या टॉश यांच्या आयुष्यात एक प्रसंग घडला. त्यांच्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला बाळ झाले आणि ती आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेली. त्यामुळे टॉश खूप एकट्या पडल्या. मुले नसलेल्या व्यक्तीला मैत्रीण करायचे होते. त्यांनी याबद्दलची पोस्ट टाकली, तेव्हा त्यांना पहिली प्रतिक्रिया आली—”हे खूप विचित्र आहे.’ टॉश यांनी उत्तर दिले, “हो, हे विचित्रच आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून माझ्यासारखीच दुसरी विचित्र माणसे मला शोधता येतील’. त्यांच्या या पोस्टला काही वेळातच हजारो लाइक्स मिळाले. कमेंट्समध्ये उत्तर देणाऱ्यांपैकी दोन जणी आज त्यांच्या सर्वात चांगल्या मैत्रिणी आहेत. आता त्या एकत्र फिरतात. कॉन्सर्ट आणि शो पाहायला जातात अन् एकत्र छान वेळ घालवतात. टॉश एका मुलाखतीत म्हणतात, “मला माहीत होते की लोक मला मूर्ख समजतील. पण आपली गरज मांडण्यात कसलीही लाज वाटण्याचे कारण नाही.’ एक-दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत आज लोक एकमेकांना भेटणे कमी झाले आहे. लोकांच्या जवळच्या मित्रांची संख्याही घटली आहे. हा लेख अशा सर्वांसाठी एक इशारा आहे. सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या मते, याची अनेक कारणे आहेत. घर आणि ऑफिस याव्यतिरिक्त असणारी ‘थर्ड स्पेस’ आता कमी झाली आहे. आपला बहुतांश वेळ स्क्रीनने हिरावून घेतला आहे. तसेच प्रौढ वयात लग्न करणे, पालक होणे किंवा स्वतःचे घर घेणे या गोष्टी मागे पडत आहेत किंवा घडतच नाहीत. ‘थर्ड स्पेस’ म्हणजे असा सामाजिक परिसर जो घर आणि ऑफिस/शाळा या दोन मुख्य ठिकाणांपेक्षा वेगळा असतो. शहरी समाजशास्त्रज्ञ रे ओल्डेनबर्ग यांनी ‘थर्ड स्पेस’ ही संकल्पना मांडली. ही संकल्पना समाजजीवनाचा पाया आहे आणि ती लोकांमधील रचनात्मक संवादाला प्रोत्साहन देते. अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटच्या एका सर्व्हेनुसार, मोबाइलमध्ये व्यग्र जगात चांगल्या आयुष्यासाठी लग्न किंवा मुलांएवढीच एका मित्राची गरज असते. हे आता अनेक लोकांना पटू लागले आहे. परंतु ऑनलाइन बनलेले नाते नेहमीच टिकेल असे नाही. जेसिका लेच यांचेच उदाहरण घ्या. त्यांच्या पोस्टवर 800 लोकांनी स्वारस्य दाखवले. पण त्यातून त्यांना फक्त एकच खरी मैत्रीण मिळू शकली. फंडा असा की- आपण स्वतःला एक प्रश्न विचारावा. या स्क्रीनमध्ये अडकलेल्या व मित्रांसाठी जाहिराती देणाऱ्या एकाकी जगाप्रमाणे आपण जगायचे का? की लहानपणापासून आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध करतील असे काही मित्र जोडायचे ? दुसरा पर्याय हा आपली ‘थर्ड स्पेस’ नेहमीच अर्थपूर्ण करेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




