प्रॉडक्ट आयडियावर चर्चा करण्यासाठी काही इतर लोकांसोबतच्या आपल्या पहिल्या बैठकीत 17 वर्षांच्या युजिनियाने चीफ एक्झिक्युटिव्ह आणि 16 वर्षांच्या नव्याने चीफ फायनान्शियल ऑफिसरची भूमिका सांभाळली. बैठकीच्या शेवटी त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उद्दिष्ट एकच आहे- आपल्या समाजात बदल आणि वास्तविक प्रभाव निर्माण करणे. सेंट पॉल्स स्कूल फॉर गर्ल्सच्या या टीनेजर्सनी सेंट पॉल्स स्कूल फॉर बॉइजच्या वर्गमित्रांसोबत मिळून काम सुरू केले आणि ते सर्वजण लंडनमधील स्वतःच्या सुरक्षिततेबाबत काळजीत होते. पण त्यांच्यापैकी कुणालाही सोबत अलार्म ठेवायचा नव्हता, कारण ते ‘क्लिनिकल’ दिसायचे आणि ते सोबत बाळगणे लाजिरवाणे मानले जायचे. हळूहळू या विद्यार्थ्यांना समस्येवरील त्यांच्याच उपायावर विश्वास वाटू लागला. अवघ्या 4 महिन्यांत त्यांनी हजारो पाउंडचा व्यवसाय केला. त्यांनी असे अलार्म विकले, जे सॉफ्ट टॉय की-रिंग्जमध्ये लपवलेले होते आणि ते सामान्य बॅग ॲक्सेसरीसारखे दिसत होते. ते अगदी एखाद्या कंपनीप्रमाणे टप्प्याटप्प्याने पुढे गेले. सर्व्हे केला, प्रोटोटाइप बनवला, बाजारात टेस्टिंग आणि शेवटी प्रॉडक्ट डिझाइन केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी एका स्पर्धेसाठी प्रोटोटाइप बनवला आणि त्यानंतर विविध ठिकाणी आणि बाजारात ग्राहकांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे तो अधिक चांगला केला. तरीही, सुरुवातीला त्यांना वाटले होते की हे प्रॉडक्ट फक्त शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या टीनेजर्ससाठी आहे, पण त्यांना हे पाहून आश्चर्य वाटले की मोठ्या संख्येने प्रौढ लोकही ते स्वतःसाठी खरेदी करू लागले. 15 ते 20 पाउंड किमतीची ही की-चेन टॉर्च आणि 3डी प्रिंटेड इनिशियल्ससारख्या पर्यायी ॲक्सेसरीजसह कस्टमाइज केली जाऊ शकते. स्पर्धेत रनर-अप ठरल्यानंतरही ते थांबले नाहीत. परीक्षकांनी त्यांना सांगितले की हे एक यशस्वी प्रॉडक्ट बनू शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच महिन्यात स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार्टअप तयार होताच त्यांनी बोत्सवानाच्या शिक्षण मंत्रालयाशी त्यांच्या 9 शाळांमध्ये हे प्रॉडक्ट विकण्याबाबत चर्चा केली आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले. सुरक्षितता हा जागतिक प्रश्न असल्याने नव्या आता याचा परदेशातही विस्तार करण्याची योजना आखत आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका घटनेत, 11 अब्ज डॉलरची सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी नोशनचे सीईओ इव्हान झाओ यांनी 2026 च्या सुरुवातीला 16 वर्षांच्या एका हायस्कूल विद्यार्थ्याला कंपनीच्या प्रॉडक्ट फीचर्सवर पार्ट-टाइम काम करण्यासाठी नियुक्त केले. नोशन टीमने जेव्हा विद्यार्थ्याने बनवलेले डिझाइन आणि एआय आधारित व्हिडिओ यूट्यूबवर पाहिले तेव्हा त्याची निवड करण्यात आली. कंपनीचे असे मानणे आहे की, असे हायस्कूलचे विद्यार्थी एआय टूल्स वेगाने आत्मसात करतात आणि तंत्रज्ञानाच्या मर्यादांबद्दल त्यांच्या धारणादेखील कमी असतात. नोशनच्या तरुण कर्मचाऱ्यांनी अलीकडेच बनवलेला सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे एक अनोखे एआय चॅट ॲप आहे. हे ईमेल आणि कॅलेंडर व्यवस्थापनासाठी डिझाइन केलेले डेडिकेटेड चॅट-फर्स्ट इंटरफेस आहे, ज्याला युजरच्या नोशन कॉन्टेक्स्टपर्यंत पूर्ण ॲक्सेस दिला गेला आहे. झाओ यांनी सांगितले की, एका छोट्या टीमने एआय कोडिंग एजंट्सच्या मदतीने अतिशय वेगाने ते तयार केले. मुख्यतः 10 वीच्या याच विद्यार्थ्याने तयार केलेल्या आणि अद्याप घोषित न झालेल्या एका नवीन प्रॉडक्टची ‘महत्त्वाची खेप’ याच महिन्यात सादर केली जाणार आहे. झाओ म्हणाले की एआयमधील प्रगतीमुळे ‘अफाट अनुभव आता महत्त्वाचा राहिला नाही.’ म्हणूनच नोशन आता एक तर खूप तरुण, किंवा अतिशय अनुभवी सीनियर ऑपरेटर्स निवडत आहे. हे दर्शवते की उद्योजक आता ‘क्षमतां’ ऐवजी ‘जिद्दीवर’ जास्त लक्ष देऊ लागले आहेत. त्यांना असे लोक हवे आहेत, जे बाजारपेठ काबीज करण्यासाठी इतरांपेक्षा अधिक वेगाने त्यांचा व्यवसाय पुढे नेऊ शकतील. आणि यासाठी या 16 वर्षांच्या टीनेजर्सपेक्षा चांगले कोण असू शकेल, जे तंत्रज्ञानाच्या युगातच जन्माला आले आणि ज्यांनी तंत्रज्ञानाला अनेक रूपांमध्ये विकसित होताना पाहिले आहे. फंडा हा आहे की आंत्रप्रेन्युअर्सनी आसपासच्या शाळांमध्ये जायला हवे. मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा आयोजित करून अशा हायस्कूल विद्यार्थ्यांचा शोध घ्यायला हवा, जे एआय-नेटिव्ह असतील, चपळतेने काम करणारे असतील आणि त्यांच्या व्यवसायासाठी ‘आऊट ऑफ बॉक्स’ आयडिया देऊ शकतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

तारकर्ली किनाऱ्यावर दोन मासेमारी नौकांना आग; लाखोंचं नुकसान! 🔥🚤
पुण्यात कोहिनूर ग्रीन सोसायटी परिसरात रोड रेसिंगचा वाढता धोका; नागरिक आणि नगरसेवक आक्रमक,
उघड्यावर दारू पिणाऱ्यांविरोधात विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई; १५ जण ताब्यात!
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




