- Marathi News
- Opinion
- Valley State Prison VR Headsets Enable Virtual Travel & Job Interviews For Inmates
7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

गेल्या वीस वर्षांपासून तो चौचिल्लामध्ये एकाच ठिकाणी राहत होता. त्या छोट्याशा जागेबाहेर त्याने तासाभरासाठीही पाऊल ठेवले नाही. तो बाहेर जाऊही शकत नाही. कारण त्याला कुणी तिथून बाहेर पडू देणार नाही. परंतु, गेल्या दोन आठवड्यांपासून तो थायलंडपासून ऑस्ट्रेलियापर्यंत प्रवास करत आहे. मुलाखती देत आहे आणि अनेक वेळा नाकारले गेल्यावर त्याला एक शानदार नोकरीचा प्रस्तावही मिळाला आहे. जेव्हा त्याला पहिल्यांदा नाकारले गेले तेव्हा त्याने आपल्या चुका पाहिल्या, त्या सुधारल्या आणि पुढच्या मुलाखतीत पुन्हा काही नवीन चुका केल्या, पण अखेर त्याला नोकरी मिळालीच. मात्र, तो नियुक्तिपत्र स्वीकारू शकत नाही. का माहीत आहे? कारण तो आजही त्याच जागेत आहे, जिथे गेल्या दोन दशकांपासून राहत आहे.
‘काय मूर्खपणा आहे हा’ - असे तुम्हाला वाटू शकते. बाहेर न जाता आणि प्रत्यक्ष मुलाखत न देता त्याला नोकरीचा प्रस्ताव कसा काय मिळाला, असा विचार तुम्ही करत असाल. मी तुमची थट्टा करत आहे असे तुम्हाला वाटतेय का? मुळीच नाही. तुम्ही वर जे काही वाचले ते सर्व सत्य आहे. कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल व्हॅलीमधील चौचिल्ला शहरात असलेल्या ‘व्हॅली स्टेट प्रिझन’मध्ये तुमचे स्वागत आहे. वर ज्याच्याबद्दल सांगितले तो एकटाच नाही, तर येथील अनेक कैद्यांना अशा प्रकारचे हेडसेट (व्हीआर हेडसेट) घालण्यात आले आहेत, जे अपारदर्शक चष्म्यासारखे दिसतात. हाय डेफिनिशन व्हिडिओ सुरू होताच त्यांची मान हळूच वळली आणि चेहऱ्यावर हसू आले. त्यांचा प्रवास सुरू झाला होता. कोणी जगातील इतर भाग पाहत आहे, तर कोणी ते ठिकाण पाहत आहे जिथून तो आला होता आणि गेल्या वीस वर्षांत त्यात कसे बदल झाले आहेत. तर काहींनी नोकरीच्या मुलाखतीसारखे व्यावहारिक अनुभव घेतले. कैदी आभासी डेस्कवर आभासी मुलाखतकारांसमोर बसले. मुलाखतकारांची वृत्ती कधी सहज तर कधी कडक असते आणि ते कैद्यांना सुटका झाल्यानंतर रोजगार शोधण्याचे कौशल्य शिकवतात.
त्यांच्यासाठी बाहेरील जग पूर्णपणे बदलले आहे - अर्ज करण्यापासून ते मुलाखतीपर्यंत सर्वच. एखाद्यासमोर बसून त्याला ‘मी या नोकरीसाठी योग्य का आहे’, हे पटवून देणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. हेडसेट काढल्यानंतर स्वयंसेवक कैद्यांना त्या भावना आणि मानसिक धक्क्यातून सावरण्यास मदत करतात, जे या अनुभवादरम्यान समोर आले होते. हे कैदी लवकर मुक्त होणार नाहीत. काही कैदी २०३० मध्ये, तर काही कदाचित २०४० नंतर सुटतील. पण तेव्हा त्यांना ही खंत नसेल की ‘तंत्रज्ञानात आपण मागे पडलो.’ अनेक दशकांपासून तुरुंगात असलेल्या काही लोकांना तर एटीएम कसे चालते हेसुद्धा माहीत नाही. जगात किती नवीन गोष्टी आल्या आहेत आणि यंत्रांच्या वापरामुळे जगाला किती सोयी मिळाल्या आहेत याची त्यांना कल्पना नाही.हा असा कार्यक्रम आहे, जो बाहेरील जग आत आणतो. कैद्यांचे पुनर्वसन आणि विशेषतः आता बदललेल्या समाजाशी त्यांना पुन्हा जोडण्यासाठी असे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यांनी दीर्घकाळापासून वास्तविक जग पाहिले नाही, त्यांना साधी सिटी बस कशी पकडायची किंवा मेट्रो सेवा कशी वापरायची हे माहीत नाही. कारण त्यांच्या अनुपस्थितीत या गोष्टी सुरू झाल्या आहेत. या तंत्रज्ञानामुळे त्यांना मानसिक फायदा मिळतो आणि तणाव कमी होतो.
जर ‘व्हीआर हेडसेट’ कैद्यांना तुरुंगाबाहेरचे आयुष्य दाखवू शकतात, त्यांचा मानसिक धक्का कमी करू शकतात, भावना संतुलित करू शकतात आणि खऱ्या जगात सुरक्षित पुनरागमनासाठी सज्ज करू शकतात, तर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला बोस्टनला नेऊन हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसोबत का शिकवता येणार नाही - मग ते आभासी पद्धतीने का असेना. यामुळे अनोळखी जगात त्यांचा प्रवेश सोपा होईल. मुले आभासी मुलाखती देऊ शकतात आणि विद्यापीठाच्या समुपदेशकाच्या मदतीने चुका सुधारू शकतात, जेणेकरून कठीण मुलाखतींमध्ये यश मिळवण्यासाठी स्वतःला तयार करू शकतील. ते आवडीचे शहर निवडू शकतात. तिथल्या स्थानिक बसपासून ते किराणा दुकानांपर्यंत आणि भाड्याच्या घरांपर्यंत सर्व काही जाणून घेऊ शकतात, जेणेकरून जेव्हा ते प्रत्यक्ष तिथे जातील, तेव्हा त्यांच्यासाठी सर्व काही सोपे असेल.

हा कॉलम मोबाइलवर ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
This post was originally published on this site.
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




