Rajasthan : राजस्थान उच्च न्यायालयाने 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या दांपत्याच्या 58 वर्षे जुन्या विवाहबंधनाला तडा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती सुदेश बंसल आणि न्यायमूर्ती अनिल कुमार उपमन यांच्या खंडपीठाने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पतीने दाखल केलेली अपील फेटाळून लावत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
न्यायालयाने स्पष्ट केले की वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद, वाद-विवाद आणि चढ-उतार हे स्वाभाविक असतात. मात्र अशा सामान्य घटनांना ‘क्रूरता’ म्हणून दाखवत घटस्फोटाचा आधार बनवणे योग्य नाही. विशेषतः या वयात घटस्फोट मंजूर केल्यास केवळ पत्नीच नाही तर संपूर्ण कुटुंबावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. समाजातील सर्व सदस्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचू शकतो असेही न्यायालयाने नमूद केले.
पतीचा आरोप काय?
सदर दांपत्याचा विवाह 29 जून 1967 रोजी झाला होता. 2013 पर्यंत त्यांनी तब्बल 46 वर्षे कोणतीही तक्रार नोंदवता एकत्र संसार केल्याचे पतीने स्वतः 26 मे २०१४ रोजी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत मान्य केले होते. न्यायालयाने निरीक्षण केले की इतका दीर्घ कालावधी एकत्र राहिल्यानंतर आणि वाढत्या वयानुसार मानसिक परिपक्वता व सहनशीलता वाढलेली असते. सुरुवातीच्या अडचणी कालांतराने परस्पर समजुतीने सोडवता येतात.
पतीने दावा केला की 2014 मध्ये पत्नीने त्यांच्याविरुद्ध खोटी हुंडाबळीची एफआयआर दाखल केली होती. जी पोलिसांनी चौकशीनंतर खोटी ठरवून बंद केली. त्यामुळे त्यांना सामाजिक अपमान सहन करावा लागला. तसेच पत्नी सर्व स्थावर मालमत्ता फक्त मोठ्या मुलाच्या नावावर करायला इच्छुक असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतः मात्र दोन्ही मुलांमध्ये समान वाटणी व्हावी अशी त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पत्नी मोठ्या मुलाच्या प्रभावाखाली असून त्यांची काळजी घेत नाही तसेच इतर महिलांशी संबंध असल्याचे खोटे आरोप करते असेही त्यांनी म्हटले.
पत्नीची बाजू
पत्नीने मात्र पतीवर गंभीर आरोप केले. पती कुटुंबीय मालमत्ता विक्री किंवा वाटप करून वाया घालवण्याच्या तयारीत असल्याचे तिने सांगितले. त्यास विरोध केल्यावर पतीने लहान भावाच्या प्रभावाखाली येत घटस्फोटाची याचिका दाखल केली असा दावा तिने केला.
तसेच पतीचे इतर महिलांशी अवैध संबंध असल्याचा आरोपही तिने केला. एका महिलेचा घरात प्रवेश करून तिला खोलीत ठेवण्यात आल्याची घटना घडल्याचेही तिने नमूद केले. संबंधित मालमत्ता स्वतःने खरेदी केलेली असल्यानेच तिला एफआयआर दाखल करावी लागली असेही पत्नीने स्पष्ट केले.
न्यायालयाचे निरीक्षण
उच्च न्यायालयाने नमूद केले की मालमत्तेच्या वादामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र केवळ त्या कारणावरून इतक्या वयस्क दांपत्याचा विवाह मोडणे योग्य नाही. पोलिसांनी हुंडाबळीची एफआयआर खोटी ठरवली असली तरी घरात इतर महिला असल्याच्या घटनेला पूर्णपणे असत्य ठरवलेले नाही असेही न्यायालयाने निरीक्षणात घेतले.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




