इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका आता भारतीयांनाही बसायला सुरुवात झाली आहे. सध्या इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. यामुळे अनेक देशांनी आपली हवाई क्षेत्रे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केली आहेत. यामुळे फिरण्यासाठी, कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त गेलेले अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. आता या युद्धामुळे उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाची चिंता वाढली आहे. बांदा जिल्ह्यातील कोतवाली परिसरातील नोनिया येथील सुदर्शन हा तरुण सध्या बहरीनमध्ये युद्धसदृश परिस्थितीत अडकला आहे. तो सुखरुप घरी यावा, यासाठी त्याच्या कुटुंबाकडून सरकारला वारंवार विनंती केली जात आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा वणवा आता थेट उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. बांदामधील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नोनिया परिसरात राहणारा तरुण सुदर्शन हा सध्या बहरीनमध्ये युद्धाच्या छायेखाली अडकला आहे. हॉटेल मॅनेजमेंटची स्वप्ने घेऊन परदेशात गेलेला हा तरुण सध्या क्षेपणास्त्रांच्या आवाजाने हादरला आहे.
युद्धामुळे तिथले वातावरण पूर्णपणे बदलले
मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा एक अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी आहे. त्याने गोव्यातील एका प्रतिष्ठित संस्थेतून हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करिअरला उभारी देण्यासाठी तो ८ महिन्यांपूर्वी दोन वर्षांच्या इंटर्नशिपसाठी बहरीनला गेला. सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होते, मात्र अचानक सुरु झालेल्या युद्धामुळे तिथले वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे, अशी माहिती सुदर्शनच्या आईने दिली.
सुदर्शनची आई प्रियांका यांनी तिथल्या परिस्थितीची माहिती दिली आहे. सुदर्शनचे वडील आता या जगात नाहीत. त्यामुळे प्रियांका यांनीच मोठ्या कष्टाने त्याला लहानाचे मोठे केले. सुदर्शन सध्या बहरीनमध्ये सुरक्षित असला, तरी तिथल्या युद्ध पाहून तो मानसिकदृष्ट्या खचला आहे. सुदर्शनने आपल्या कुटुंबाला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये युद्धाचा भयानक चित्रही कुटुंबाला दाखवले आहे.
व्हिडीओ खूपच धक्कादायक
त्याने पाठवलेल्या व्हिडीओत आकाशात उडणारी क्षेपणास्त्रे, त्यांचे होणारे स्फोट स्पष्टपणे दिसत आहेत. तसेच स्फोटांनंतर परिसरात काळा धूर पसरतो. यामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असतो, तेव्हा संपूर्ण शहरात सायरन वाजवला जातो. हा सायरन वाजताच सर्वांना जीव मुठीत धरुन हॉटेल किंवा सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागते, असेही त्याने पाठवलेल्या व्हिडीओत दिसत आहे.
सुदर्शनच्या आई सध्या बांदाबाहेर असून त्या उद्या संध्याकाळी पोहोचणार आहेत. मात्र, त्यांनी फोनवरूनच जिल्हा प्रशासनाला आपल्या मुलाची सर्व माहिती दिली आहे. माझा मुलगा तिथे सुरक्षित आहे, पण किती काळ सुरक्षित राहील याची शाश्वती नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्याला भारतात परत आणावे,” अशी विनंती त्यांनी भारत सरकार आणि जिल्हा प्रशासनाला केली आहे. सध्या सुदर्शनचे मित्र आणि कुटुंब व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्याच्याशी सतत संपर्कात आहेत. त्याला धीर देण्याचे काम सुरू असले तरी परिसरात पडणारी क्षेपणास्त्रे पाहता संपूर्ण कुटुंब चिंतेच्या सावटाखाली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



