अमेरिका गेल्या काही काळापासून दहशतवादाचा नायनाट करण्याचा प्रयत्न करत आहे, अशातच आता अमेरिकेने सीरियामध्ये इस्लामिक स्टेट (ISIS) विरोधातील कारवाई आणखी तीव्र केल्याची माहिती समोर आली आहे. यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने “ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक” अंतर्गत सुरू असलेल्या ऑपरेशनची नवीन माहिती जारी केली आहे. अमेरिकेने सीरियातील 30 पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ला केला आहे. यात शस्त्रास्त्रांचे डेपो आणि इतर सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इस्लामिक स्टेटने डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला केला होता. यात दोन अमेरिकन सैनिक आणि एका अमेरिकन नागरिकाचा अनुवादक मारला गेला होता. पालमिरा येथे झालेल्या या हल्ल्यातील हल्लेखोर सीरियन सुरक्षा दलांमध्ये अलिकडेच भरती झालेला होता. मात्र त्याचा अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचा संशय होता. या हल्ल्यानंतर तो जागीच मारला गेला. हल्ल्याचा बदला घेण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. त्याअंतर्गत आता ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत या हल्ल्यात 50 पेक्षा जास्त लोकांना पकडले किंवा ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले आहे.
पालमिरा हल्ल्यानंतर ऑपरेशनला सुरूवात
पालमिरा हल्ल्यानंतर अमेरिकेने खास ऑपरेशनला सुरूवात केली आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना पकडण्यासाठी आणि ISIS ला पुन्हा उदयास येण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले असून या कारवाईत अमेकांचा मृत्यू झालेला आहे.
कोणत्या विमानांचा वापर?
अमेरिकेने सीरियात केलेल्या कारवाईत एफ-15ई स्ट्राइक ईगल, ए-10 वॉर्थॉग, एसी-130जे घोस्ट्राइडर आणि एमक्यू-9 रीपर ड्रोन यासारख्या विमानांचा समावेश होता. जॉर्डनच्या एफ-16 विमानांनीही मदत केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, ऑपरेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत आयसिसच्या संबंधित 50 लोकांचा खात्मा करण्यात यश आले आहे. आयसीसचे कंबरडे मोडण्यासाठी अमेरिकेकडून ही कारवाई करण्यात येत आहे. आता आगामी काळातही ही कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती समोर आले आहे. आता आयसिसकडून अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- नवी मुंबई: "मुलीवर जास्त प्रेम करतेस" म्हणून मुलाने जन्मदात्या आईची केली निर्घृण हत्या
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला
महाराष्ट्र
- सातारा: खाकीतली मानवता! शरीर साथ देईना, आधारही कोणाचा नाही; आजारी निराश्रित महिलेसाठी धावले बोरगाव पोलीस
- नवी मुंबई: "मुलीवर जास्त प्रेम करतेस" म्हणून मुलाने जन्मदात्या आईची केली निर्घृण हत्या
- सातारा: रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सातारा जिल्ह्यात खळबळ
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
गुन्हा
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.

























Subscribe to my channel



