आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:आयुष्याला सुकर करणाऱ्या‎ गोष्टींपासून दूर राहणे कठीण‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎एआयबाबत सुरू असलेल्या चर्चेत अनेक मोठी नावे‎सामील आहेत. आता हा गंभीर भू-राजकीय मुद्दा बनत‎चालला आहे. एआयच्या शर्यतीत आघाडीवर कोण‎राहणार, हा खरा प्रश्न आहे. या वर्षाच्या सुरुवातीला‎दिल्लीत एआय परिषद झाली. तरीही भारत अजून या‎शर्यतीत दिसत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे.‎कारण गेल्या दोन दशकांत भारत माहिती तंत्रज्ञान‎(आयटी) क्षेत्रात जगाचा मोठा नेता बनला होता.‎ एआयच्या शर्यतीत भारत मागे पडण्याचे मुख्य कारण‎म्हणजे यासाठी लागणारी अथांग गुंतवणूक. ही रक्कम ‎‎अब्जावधी डॉलर्सच्या घरात असू शकते. यात सरकार व ‎‎उद्योजक, दोघांच्या कल्पकतेची कमतरताही दिसून‎आली. एआय किती मोठा बदल घडवून आणेल, हे ‎‎भारतातील धोरणकर्त्यांना वेळेवर समजलेच नाही. ते ‎‎आयटी क्षेत्रातील जुन्या यशातच समाधानी राहिले.‎ संगणकाने आपले जीवन बदलले तसेच एआय सुद्धा ‎‎आपल्या जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल.‎संगणकाचा विकास हळूहळू झाला होता. पण एआय‎अत्यंत वेगाने पुढे जात आहे. ‘जनरेटिव्ह आर्टिफिशिअल‎इंटेलिजन्स''चा जन्म 2022 च्या शेवटी चॅटजीपीटीच्या‎आगमनाने झाला. त्यामुळे लोकांसाठी हा विषय अजून‎केवळ चार वर्षांचा आहे. इतक्या कमी वेळात त्याचे‎शंभर कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते झाले. एआय तंत्रज्ञान‎विकणाऱ्या कंपन्या आज बातम्या, शेअर बाजार आणि‎लोकांच्या विचारांवर राज्य करत आहेत.‎ एआय आपली कार्यक्षमता वाढवतो, हे खरे आहे. पण‎यामुळे मोठे नुकसानही होऊ शकते. ब्राऊन‎युनिव्हर्सिटीत मी चालवत असलेल्या एका चर्चासत्रात‎हार्वर्ड केनेडी स्कूलचे राजकीय विचारवंत आर्कन फंग‎यांनी एआयच्या दुहेरी परिणामांचे सुंदर विश्लेषण केले.‎एआय माणसाला अधिक सक्षम करू शकतो. त्याची‎जागा घेऊ शकतो आणि त्याला आपले गुलामही बनवू‎शकतो, असे ते म्हणाले. फंग म्हणाले, आता त्यांना‎संशोधनासाठी सहाय्यक (रिसर्च असिस्टंट) ठेवण्याची‎गरज भासत नाही. कारण एआय हे काम अतिशय सहज‎करतो. माझ्या कामातही आता हेच घडताना दिसते.‎एआय हा अत्यंत हुशार संशोधक सहाय्यक सिद्ध होत‎आहे. याशिवाय एआय निबंध लिहू शकतो. प्रश्नपत्रिका‎तयार करू शकतो आणि गणिताची अवघड कोडी‎सोडवू शकतो. त्यामुळेच आता घरी नेऊन द्यायच्या‎परीक्षांऐवजी, पूर्वीसारख्या वर्गात बसून हाताने‎लिहायच्या परीक्षा पुन्हा सुरू होत आहेत. योग्य सूचना‎दिल्यास एआय गाणे गाऊ शकतो आणि वाद्यही वाजवू‎शकतो, असे आता संगीतकारही सांगू लागले आहेत. ही‎सगळी उदाहरणे एआय माणसाची जागा कसा घेत आहे,‎हे दाखवणारी आहेत. पण माणसाला सक्षम बनवण्याच्या‎बाबतीत काय? संगणकाचे कोडिंग लिहिणे हे एआयचे‎माणसाला सर्वात जास्त सक्षम करणारे काम मानले गेले .‎अर्थात, प्रत्येक जण कोडिंग लिहू शकत नाही किंवा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रत्येकाला ते शिकावेसे वाटणार नाही. मग रोजचे आयुष्य‎सोपे करणारी एआयची काही उदाहरणे देता येतील का?‎फंग लिहितात की, एआयने लाखो लोकांना नवीन गोष्टी‎शिकण्यास आणि शोधण्यास सक्षम केले आहे.‎महत्त्वाच्या ई-मेलला उत्तरे देणे, दैनंदिन वेळापत्रक‎सांभाळणे, स्वयंपाक किंवा घराची देखभाल अधिक‎चांगल्या प्रकारे करणे, प्रवासाचे नियोजन करणे आणि‎अशाच अगणित कामांमध्ये एआयने माणसाला मदत‎केली आहे. यावरून एआयमुळे सामान्य माणसाचे‎आयुष्य सोपे होत आहे, हे उघड आहे.‎ आपले जीवन सोपे करण्याची एआयची ही क्षमता‎नाकारणे आता कठीण होईल. मध्यमवर्गीय घरात त्याचा‎मोठा प्रभाव लवकरच दिसून येईल. पण माणसाची जागा‎घेणाऱ्या एआयचा सामना कसा करायचा, हा खरा‎कठीण प्रश्न असेल. मोठ्या शहरांमधील डिलिव्हरी‎करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम सहज धोक्यात येऊ शकते.‎एवढेच नाही तर माणसाची जागा घेण्याची एआयची ही‎क्षमता ग्रामीण भारतातील शेतीवरही मोठा परिणाम करू‎शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ एआयचा वापर कोणत्या पातळीपर्यंत‎करायचा, हे ठरवण्यात सरकारची धोरणे‎मोठी भूमिका बजावू शकतात. शस्त्रास्त्रे‎आणि युद्धाच्या मैदानावरील निर्णयांमध्ये‎एआयचा वापर किती प्रमाणात व्हावा, हे‎ठरवण्याचा समावेशही यात होतो.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *