रांजणगाव गणपती: पुणे जिल्ह्यात गुन्हेगारांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. आता तर थेट कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरच गोळीबार करण्याइतपत गुंडांची हिंमत वाढली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती जवळील वाघाळे-पिंपरी दुमाला परिसरात पोलीस आणि फरार गुन्हेगारांमध्ये थरारक पाठलाग आणि गोळीबाराची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच पोलिसांचा सापळा, पण... चऱ्होली गोळीबार प्रकरणातील संशयित आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे विशेष पथक शिरूर तालुक्यात दाखल झाले होते. हे आरोपी सोनेसांगवी येथील शेळके वस्ती परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्तहेरांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच सावध झालेल्या आरोपींनी दुचाकीवरून तातडीने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
थरारक पाठलाग आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार आरोपी पळू लागताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. अष्टविनायक रोडवरील रांजणगाव गणपती चौक परिसरात पोलीस आणि आरोपींमध्ये जोरदार थरारक पाठलाग रंगला. दरम्यान, पळत असताना अचानक आरोपींची दुचाकी बंद पडली. त्यामुळे त्यांनी आपली दुचाकी रस्त्यातच सोडून दिली. अंधाराचा आणि शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतांचा फायदा घेत त्यांनी पिंपरी दुमाला-वाघाळे परिसराच्या दिशेने धूम ठोकली.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून जात असताना आरोपींनी पोलिसांवर व हवेत गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी हवेत आणि आरोपींच्या दिशेने काही राऊंड फायर केले. या दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला.
रात्रभर पोलिसांचे सर्च ऑपरेशन आणि नाकाबंदी या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी संपूर्ण पिंपरी दुमाला आणि वाघाळे परिसरात तातडीने नाकाबंदी लागू केली. आरोपी ऊसाच्या घनदाट शेतात लपल्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या विविध पथकांनी टॉर्च आणि आधुनिक शस्त्रांसह रात्रभर ऊसाच्या शेतांमध्ये व वस्तीभागात मोठे सर्च ऑपरेशन (शोधमोहीम) राबवले.
फरार आरोपींपैकी 'शेखर संभाजी जाधव' या संशयित गुंडाचे नाव प्रामुख्याने समोर येत असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांच्या गाड्यांचा सायरन आणि धावपळीमुळे सोनेसांगवी व परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुण्यात कोयता गँग आणि स्थानिक भाई-दादांच्या टोळक्यांचा वाढता उच्छाद पाहता, अशा गुन्हेगारांना पोलिसांनी कायमचा धडा शिकवावा आणि त्यांचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel





https://shorturl.fm/ePMFr
https://shorturl.fm/qEJNp
https://shorturl.fm/UjYj6