
Pune : शहरातील २४ लाखांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य आहे. त्यापैकी सुमारे साडेनऊ लाख वाहनांनीच नंबर प्लेटसाठी नोंदणी केली. सात लाख ५६ हजार ३५६ वाहनांना प्रत्यक्षात नंबर प्लेट लावण्यात आली, तर सुमारे १५ लाख वाहने अद्यापही नंबर प्लेटपासून दूर आहेत. रविवार (ता. ३०) नोंदणीसाठी अंतिम तारीख आहे.
राज्य परिवहन विभागाने वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली. मात्र, पुण्यातील सुमारे ३० टक्के वाहनांनीच नंबर प्लेट लावली आहे. आता कोणत्याही परिस्थिती मुदतवाढ देणार नाही, असे परिवहन विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नंबर प्लेट लावण्यासाठी पुणे आरटीओकडे नोंद असलेल्या २४ लाख २८ हजार ५८९ वाहनांपैकी केवळ सात लाख ५६ हजार ३५६ वाहनधारकांनीच नंबर प्लेट लावली आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत नऊ लाख ४८ हजार ३६९ वाहनांची नोंदणी झाली आहे.
|
|
वाहनधारकांचा अपुरा प्रतिसाद, ऑनलाइन नोंदणीत येणाऱ्या अडचणी, उशिरा मिळणाऱ्या नंबर प्लेट, केंद्रचालक वाहनधारकांकडून अतिरिक्त रक्कम घेणे आदी कारणांचा परिणाम नंबर प्लेट लावण्यावर झाला आहे. नंबर प्लेट लावण्याच्या अंतिम मुदतीला काही दिवसच शिल्लक आहेत. यात काही प्रमाणात वाहनांची नोंदणी होईल. मुदतवाढ न मिळाल्यास वाहनांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. अशा वाहनांना एक हजार रुपये दंड होऊ शकतो.
उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ दिली आहे. त्याला अपेक्षित प्रतिसाद लाभलेला नाही. आता मुदतवाढ न मिळाल्यास ३० नोव्हेंबरनंतर वाहनांवर कारवाई करणार आहोत.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
शहर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
- मुंबई: भाजपच्या जाळ्यात अजिबात अडकू नका!"; छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी संघर्ष घडवल्याचा गंभीर आरोप
- पुणे: गॅस तुटवडा १४ किलोची गॅस जोडणी बंद; १० किलोचा १६८० रुपयांचा महागडा पर्याय नागरिकांच्या माथी!
- छत्रपती संभाजीनगर: मध्यरात्रीचा थरार संजय शिरसाटांच्या घरावर दगड आणि बाटल्याफेक, तिघे तरुण अटकेत
महाराष्ट्र
- रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे भीषण अपघात! आंजणारी पुलाजवळ ट्रकची खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक; २३ प्रवासी जखमी, ४ गंभीर
- पुणे: 'सिंहगड' संस्थेला मोठा दणका! कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन प्रकरणी सात महाविद्यालयांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती; तीन वर्षांसाठी कारभार शासनाच्या ताब्यात
- मुंबई: भाजपच्या जाळ्यात अजिबात अडकू नका!"; छठपूजेच्या वादावरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी संघर्ष घडवल्याचा गंभीर आरोप
- पुणे: गॅस तुटवडा १४ किलोची गॅस जोडणी बंद; १० किलोचा १६८० रुपयांचा महागडा पर्याय नागरिकांच्या माथी!
गुन्हा
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




