नागपूरमध्ये काळाचा घाला! रस्त्यावरील खड्ड्यामुळे ई-बाईकवरून पडून तरुणीचा दुर्दैवी अंत, बसने चिरडल्याने जागीच मृत्यू!

नागपूर: शहराच्या मुख्य अशा कामठी मार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुर्दशामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी सकाळी कपिलनगर पोलिस हद्दीतील सायोना पब्लिक स्कूलसमोर ही हृदयद्रावक घटना घडली. रस्त्यावर पडलेल्या एका खोल खड्ड्यामुळे तरुणीची ई-बाईक अचानक अनियंत्रित झाली आणि ती थेट दुभाजकावर (Divider) आदळली.

नेमके काय घडले? अपघातग्रस्त तरुणी आपल्या ई-बाईकने जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे तिचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या धक्क्याने ती रत्यावर फेकली गेली. त्याच वेळी मागून येणारी नागपूर महानगरपालिकेची इलेक्ट्रिक 'आपली बस' तेथून जात होती. तरुणी रस्त्यावर पडलेली असतानाच बसने तिला चिरडले. ही धडक इतकी भीषण होती की, तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

प्रशासनाची निष्काळजी आणि संताप: अपघाताची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे. शहरात रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. "रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आमची मुले बळी पडत आहेत, याला जबाबदार कोण?" असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. निष्पाप तरुणीच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *