राज्यातील कृषी व संलग्न विद्यापीठांच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची (CAP Round 1) पहिली प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या फेरीत राज्यभरातून तब्बल १०,८७१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, हजारो विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे.
या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातून एकूण २३,८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १८,९९३ विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीचे महाविद्यालय व अभ्यासक्रमांचे पर्याय (Choice Filling) मुदतीत यशस्वीरित्या भरले होते. या पात्र विद्यार्थ्यांमधून पहिल्या फेरीची प्रवेश यादी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमातील पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले आहे, अशा ३,१४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश 'ऑटो फ्रिज' (Auto Freeze) करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना ते महाविद्यालय सक्तीचे असणार असून, त्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास मुभा मिळणार नाही, असा स्पष्ट नियम आहे.
विद्यापीठनिहाय मिळालेले प्रवेश:
या पहिल्या प्रवेश फेरीत राज्यातील चार प्रमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवले आहेत:
-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी: ४,७०० विद्यार्थी
-
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी: २,९६८ विद्यार्थी
-
डॉ. पंजाबराव देशमूक कृषी विद्यापीठ, अकोला: २,४६९ विद्यार्थी
-
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली: ७३४ विद्यार्थी
अभ्यासक्रमनिहाय प्रवेशाची स्थिती:
कृषी आणि संलग्न नऊ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे:
-
बीएससी (ऑनर्स) कृषी (Agriculture): ७,८७८ जागा
-
बी.टेक अन्न तंत्रज्ञान (Food Technology): ८६२ जागा
-
बीएससी (ऑनर्स) उद्यानविद्या (Horticulture): ५५९ जागा
-
बी.टेक बायोटेक्नॉलॉजी: ५५३ जागा
-
बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन (Agri Business Management): ४९५ जागा
-
बी.टेक कृषी अभियांत्रिकी (Agricultural Engineering): ४१४ जागा
-
बीएससी (ऑनर्स) वनीकरण (Forestry): ५३ जागा
-
बीएससी (ऑनर्स) समुदाय विज्ञान (Community Science): ३३ जागा
-
मत्स्यविज्ञान (Fishery Science): २४ जागा
ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालये अलॉट झाली आहेत, त्यांनी १७ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश स्वीकृतीसाठी १ हजार रुपयांचे शुल्क भरून 'फ्रीज' किंवा 'फ्लोट' यापैकी योग्य तो पर्याय निवडावा लागणार आहे. या प्रक्रियेमुळे कृषी शिक्षणासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




