पुणे: जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मंदिरालगत असलेली फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याची मोक्याची जागा दगडूशेठ गणपती ट्रस्टला हस्तांतरित करण्यासाठी पुणे पोलिसांनी राज्य सरकारच्या गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवला असून, या प्रस्तावास तत्त्वत: 'ना-हरकत' (NOC) दर्शविण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाविकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
नेमका प्रस्ताव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याची सध्याची इमारत १९७६-७७ मध्ये बांधण्यात आली होती. या जुन्या इमारतीत पुणे पोलिसांच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय, वाहतूक विभाग आणि फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाणे कार्यरत आहे. दगडूशेठ मंदिरात वर्षभर, विशेषतः संकष्टी व अंगारक चतुर्थी तसेच गणेशोत्सवात लोटणाऱ्या अलोट गर्दीचा विचार करून मंदिराच्या विस्तारीकरणासाठी या जागेची गरज भासत होती.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे नुकताच सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, बुधवार पेठेतील महापालिकेची जागा (सिटी सर्व्हे क्रमांक १११२ आणि १११३) प्रथम पोलीस दलाच्या नावावर हस्तांतरित केली जाईल. या नव्या जागेवर पोलिसांसाठी अत्याधुनिक आणि प्रशस्त इमारत बांधण्यात येणार असून, नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कामकाज पूर्णपणे त्या नवीन ठिकाणी स्थलांतरित केले जाईल. त्यानंतरच सध्याची जुनी जागा दगडूशेठ गणपती ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याची पुढील प्रक्रिया पार पडेल.
सुविधांचा विस्तार आणि नियोजन: बुधवार पेठेतील नियोजित नवीन जागेचे क्षेत्रफल सुमारे ७५९.२० चौरस मीटर असून, तिथे ३.५ च्या एफएसआयमुळे सुमारे २८,६२१ चौरस फुटांचे बांधकाम करणे शक्य होणार आहे. तर फरासखानाची सध्याची जागा ८७३.७० चौरस मीटर असून येथील बांधकाम सुमारे २२ हजार चौरस फुटांचे आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पोलीस गृहनिर्माण किंवा दगडूशेठ ट्रस्टकडून केले जाण्याबाबतच्या अटी व शर्ती या प्रस्तावात नमूद करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्याचे स्थलांतर झाल्यानंतर मंदिराच्या विस्तारीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, ज्यामुळे आगामी काळात लाखो भाविकांच्या सुरक्षेचा आणि सोयी-सुविधांचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



