सांगली: मेस बदलल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून १७ वर्षीय विद्यार्थ्याला छातीवर व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना विटा येथील रेवानगर उपनगरात असलेल्या संत ज्ञानेश्वर गुरुकुल अकॅडमी, विटा येथे घडली. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात अमोल बाळासाहेब पवार (रा. बलवडी-भाळवणी, ता. खानापूर) याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
त्या जखमी विद्यार्थ्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलवडी-भाळवणी येथील अमोल पवार याची विटा नगरपालिका हद्दीतील खानापूर रस्त्यावरील रेवानगर येथील पार्वतीनगर येथे संत ज्ञानेश्वर गुरुकुल अकॅडमी आहे. पीडित विद्यार्थी हा जून २०२६ पासून रेवानगर, विटा येथील संत ज्ञानेश्वर गुरुकुल अकॅडमी येथे भरतीच्या सरावासाठी राहत आहे. ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मेस का बदलली, या
कारणावरून त्याचा अमोल पवार याच्याशी वाद झाला.
या वादातून पवार याने अल्पवयीन विद्यार्थ्याच्या छातीवर व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी विद्यार्थ्याने सोमवारी विटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान जखमी विद्यार्थ्यास उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याची नोंद कोल्हापूरच्या सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
"माझा मुलगा संत ज्ञानेश्वर अकॅडमीत आहे. अकॅडमीच्या संबंधित मेसमध्ये तो जेवत होता. मात्र त्या जेवणात अळ्या सापडल्या. यामुळे मुलाने मेस बदलली. त्याचा राग मनात धरून अमोल पवार याने रात्री ११ वाजता झोपलेल्या मुलास उठवून अमानुष मारहाण केली. याची विचारणा केल्यानंतर मलाही दमदाटी केली. - जखमी विद्यार्थी याचे वडील'
शहर
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- "देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- जालना: 'बस सुरू करा, नाहीतर आमचं शिक्षण थांबेल'; जालन्यातील विद्यार्थिनींचा शिक्षणासाठी रस्त्यावर संघर्ष.
गुन्हा
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!

























Subscribe to my channel




