पुणे: हायवेवरील एका ठिकाणी नाश्तानंतर एका मित्राने स्टेअरिंग घेतले, त्यामुळे इतरांनी "तू रात्री कार चालवू नकोस" असे बजावले. मात्र, त्याने ऐकले नसल्याने पुढे भयावह दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चारही मित्रांना जीव गमवावा लागला. जणूकाही मृत्यूची चाहूल त्यांना लागली होती.
नेहमीप्रमाणे माथेरानची पावले ओळखणारे हे तरुण या वेळी महाबळेश्वरकडे मोर्चा वळवत होते. पुणे जिल्ह्यातील मावळ व कामशेत येथील १३ मित्रांनी महाबळेश्वरची वारी आखली होती. एका मुलाच्या पालकांनी इतक्या लांब जाऊ नका, असे सांगून गाडी नाकारली होती. मात्र, त्या मुलाने ऐकले नाही आणि दोन्ही कारमधून १३ जण महाबळेश्वरकडे निघाले. गाडीत आनंदाच्या लहरी झुलत असताना कापूरव्होळला त्यांनी रात्री नाश्ता केला. नाश्त्यानंतर मयूर शिंदेने स्टेअरिंग हाती घेतले. मित्रांनी त्याच्या रात्री गाडी चालवण्यास नकार दिला होता, पण तो ऐकलाच नाही. भरधाव वेगात कार शिरवळ इथे दुर्घटनेला सामोरे जाऊन चारी मित्रांनी प्राण गमावले. "मित्रांचे ऐकले असते, तर सगळे मित्र आज हसतखेळत असते" असे बघणाऱ्यांच्या ओठांवर आहे.
महाबळेश्वर येथे मित्राचा वाढदिवस व पर्यटनासाठी निघालेल्या मित्रांच्या भरधाव कारवरील नियंत्रण सुटून कार रस्ता दुभाजकाला धडकत तीन ते चार वेळा पलटी होऊन विरुद्ध दिशेला येऊन मालट्रकला धडकली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शिरवळ हद्दीत सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.
वेदांत अर्जुन वारिंगे (वय १९, मूळ रा. वारंगवाडी, तळेगाव दाभाडे), निखिल बाळू राऊत (२०, रा. करंज, कामशेत), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९, सध्या रा. कामशेत, ता. मावळ, मूळ रा. कानपूर), आदित्य बाळासाहेब गरुड (१९, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ) अशी मृतांची नावे आहेत. दीक्षित दयानंद पुजारी (२०, रा. कामशेत), कारचालक मयूर हनुमंत शिंदे (२०, रा. बऊर, कामशेत), मालट्रक चालक शिवकुमार देवांगत (३६, रा. कुप्पेलुर, जि. हावेरी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. कारचालक मयूर शिंदे व दीक्षित पुजारी यांना तळेगाव दाभाडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
मावळ तालुक्यातील कामशेत, बऊर, टाकवे, वारंगवाडी येथील १३ युवक दोन कारमधून मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता महाबळेश्वरला येत होते. मध्यरात्री कापूरव्होळ येथे नाश्ता करून दोन्ही कार महाबळेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी कार (एमएच १४ एलजे ३०३३) मयूर शिंदे चालवीत होता. ते शिरवळ हद्दीत आले असता मयूरचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्ता दुभाजकाला धडकत विरुद्ध पुणे रस्त्याच्या बाजूला येत तीन ते चार पलटी मारून बेडगी येथून सुरतला निघालेल्या मालट्रकला (केए २७ सी ५८७८) धडकली. धडक एवढी जोरदार होती की कारमधील वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड, निखिल राऊत हे जागीच ठार झाले तर तीनजण गंभीर जखमी झाले. कारचा चक्काचूर झाल्याने अडकलेले मृतदेह बाहेर काढताना तीन तासांहून जास्त वेळ लागला. गंभीर जखमींवर शिरवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पालकांनी कारची चावी काढली, यांनी दुसरी कार केली
मित्राचा वाढदिवस साजरा करण्याकरिता लहानपणापासूनचे जिवलग मित्र असलेल्या १३ मित्रांनी एकत्रित येत माथेरानला जाण्याचे नियोजन केले होते. ऐनवेळी एकाच्या पालकांनी कारची चावी काढून घेतल्याने संबंधितांचा हिरमोड झाला होता. मात्र मित्रांच्या आनंदावर विरजण पडू नये याकरिता तत्काळ मित्रांनी कारची व्यवस्था करीत माथेरानऐवजी महाबळेश्वरकडे जाण्याचे नियोजन केले. शिरवळ येथे काळाने घाला घातल्याने जीव गमवावा लागला.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



