इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात आघाडीवर असलेल्या 'एथर एनर्जी' (Ather Energy) कंपनीने त्यांच्या आगामी नवीन मास-मार्केट (सर्वसामान्य ग्राहकांसाठी) इलेक्ट्रिक स्कूटरची पहिली झलक अधिकृतपणे जाहीर केली आहे. एथरचे सह-संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी सोशल मीडियावर असेंब्ली लाइनवरील या नवीन प्रॉडक्शन-रेडी स्कूटरचा फोटो शेअर केला असून, या घोषणेमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आगामी 'एथर कम्युनिटी डे' (Ather Community Day) सोहळ्यात म्हणजेच २९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक स्तरावर अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे.
ही नवीन ई-स्कुटर कंपनीच्या पूर्णपणे नवीन आणि मॉड्यूलर अशा 'ईएल' (EL Platform) प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. एथरने मागील वर्षी सादर केलेल्या 'EL01' कॉन्सेप्टवर ही स्कूटर आधारित असून, तिची रचना (डाईझाइन) व्यावहारिक आणि फॅमिली-ओरिएंटेड ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या यापूर्वीच्या ४५० (450 Series) सिरीजमधील स्कुटर या प्रामुख्याने परफॉर्मन्सवर आधारित आहेत, मात्र 'ईएल' प्लॅटफॉर्म विशेषतः मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या कम्युटर आणि फॅमिली स्कूटर सेगमेंटला डोळ्यासमोर ठेवून डिझाइन करण्यात आला आहे. याद्वारे कंपनीचा उद्देश भारतीय बाजारात अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आहे.
सध्या समोर आलेल्या पहिल्या झलकीनुसार, या नवीन स्कूटरमध्ये काही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. एथरच्या सध्याच्या मॉडेलमधील पॉलिमर पॅनेल्सऐवजी यात मेटल बॉडी पॅनेल्सचा वापर करण्यात आल्याचे दिसते. तसेच यात लांब सिंगल-पीस सीट आणि फ्लॅट फ्लोरबोर्ड देण्यात आला आहे, ज्यामुळे रोजच्या प्रवासात चालकास आणि कुटुंबास अधिक सोय आणि आराम मिळणार आहे. याशिवाय यात हँडलबर-माउंटेड हेडलाइट, फ्रंट अप्रॉनवर वाइड एलइडी डीआरएल (DRL), १४ इंचाचे फ्रंट व्हील आणि १२ इंचाचे रियर व्हील दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'ईएल' प्लॅटफॉर्मची निर्मिती करताना कंपनीने देशभरातील सुमारे २६ लाख किलोमीटरहून अधिकच्या रिअल-वर्ल्ड रायडिंग डेटाचा वापर केला आहे. हा प्लॅटफॉर्म मॉड्यूलर असल्याने यात २kWh ते ५kWh क्षमतेचे बॅटरी पॅक बसवले जाऊ शकतात. तसेच यात नवीन सायलेंट गिअर-ड्राईव्ह मोटर, ऑन-बोर्ड चार्जर आणि लांब सर्व्हिसिंग इंटरव्हल्स दिले जाणार आहेत, ज्यामुळे वाहनाची देखभाल करणे सोपे होईल. बाजारात या स्कूटरची किंमत अंदाजे १ लाख रुपयांपासून १.२५ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. किंमतीच्या बाबतीत ही स्कूटर कंपनीच्या सध्याच्या 'रिझता' (Rizta) आणि '४५०' सीरिजच्या खाली स्थान घेऊ शकते, ज्यामुळे ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस, बजाज आणि हिरो मोटोकॉर्पच्या उत्पादनांना तगडी स्पर्धा मिळेल. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कम्युनिटी डे सोहळ्यात या स्कूटरच्या किंमतीसह सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा अधिकृत खुलासा केला जाईल.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




