
Chhatrapati Sambhajinagar : शहरातील चिकलठाणा परिसरातील मूर्तीजापूर येथे एका चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. माणुसकी दाखवून भिक्षेकरी महिलेला काल महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त साबुदाणा खिचडी खायला देणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीलाच पळवून नेण्याचा प्रयत्न या महिलांनी केला. मात्र, मुलीच्या आईची सतर्कता आणि नागरिकांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असून सतर्क नागरिकांनी आरोपी महिलांना एमआयडीसी सिडको पोलिसांच्य ताब्यात दिलं आहे.
नेमका प्रकार काय?
मूर्तीजापूर येथील म्हाडा कॉलनी परिसरात रविवारी १५ फेब्रुवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी ८ वाजेपासून परिसरात रिक्षाने आलेल्या ३ ते ४ भिक्षेकरी महिला घराघरात डोकावून पाहणी करत होत्या. सायंकाळी एका १० वर्षांच्या मुलीने एका महिलेला माणुसकीच्या नात्याने साबुदाणा खिचडी खायला दिली. तेव्हा त्या महिलेने, तुझ्या गळ्यातील सोन्याची चैन छान आहे, ती मला दे अशी मागणी केली. मुलीने नकार देताच महिलेने तिचा हात धरून चल माझ्यासोबत म्हणत ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईने हा प्रकार पाहताच आरडाओरड केली, ज्यामुळे परिसरातील नागरिक तातडीने जमा झाले. पळून जाणाऱ्या तिन्ही भिक्षेकरी महिलांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि त्यांना चोप दिला. त्यानंतर नगरसेवक मनोज गांगवे व दीपक खोतकर यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे.
केंब्रिज परिसरात ठोकलेत तंबू
पोलीस तपासात समोर आलं आहे की, या महिला केंब्रिज परिसरातील मोकळ्या मैदानात तंबू ठोकून राहत आहेत. दिवसा शहराच्या विविध भागात रिक्षाने फिरून त्या भिक्षा मागण्याचे काम करतात आणि घरांची पाहणी करतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

