
Pune : राज्यभरात महाशिवरात्रीचा उत्साह बघायला मिळाला. राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावामध्ये लाखो शिवभक्तांनी शिव मंदिरात जावून दर्शन घेतलं. सर्वत्र उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. पण या उत्साहाला हरिचंद्रगड येथे गालबोट बघायला मिळालं. कारण एक अप्रिय घटना हरिचंद्रगडावर घडली. हरिचंद्रगडावर भगवान शिवाचं दर्शन घेऊन खाली उतरत असताना भाविकावर काळाने घाला घातला. गडावरुन खाली उतरत असताना अचानक एक दगड निसटला आणि तो भाविकाचा डोक्यावर आदळला. यानंतर दगड भाविकाच्या पाठिवर कोसळला. या दुर्घटनेत भाविकाचा मृत्यू झाला.
सुरेश किसन दामसे असं मृतक भाविकाचं नाव आहे. ते 35 वर्षांचे होते. सुरेश हरिचंद्रगडावरुन दर्शन घेऊन खाली उतरत होते. पण याचवेळी कड्यावरचा सैल दगड अचावक खाली निसटला आणि त्यांच्या डोक्यावर आणि पाठिवर कोसळला. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि ते जागेवरच बेशुद्ध झाले.
5 किमी पायी चालत भाविकाला उपचारासाठी नेलं, पण...
या घटनेनंतर इतर भाविकांनी आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीला धावले. हरिचंद्रगडावरुन खाली नेणं आणि वैद्यकीय मदतीसाठी घेऊन जाणं हे खूप कठीण कार्य होतं. मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्त आणि भाविकांनी दुर्गम आणि कठीण पायवाट असल्यामुळे पाच किमी पायी चालत खिरेश्वर गावात सुरेश दामसे यांना जखमी अवस्थेत आणलं गेलं. तिथून त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुरेश यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
सुरेश दामसे हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे रहिवासी होते. या घटनेमुळे दामसे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे एखाद्या भाविकाचा मृत्यू कड्यावरील सैल दगड कोसळल्याने होत असेल तर प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. प्रशासन या घटनेची दखल घेऊन आगामी काळात खरंच काही कारवाई करतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
शहर
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
महाराष्ट्र
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
गुन्हा
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!

























Subscribe to my channel


