India Pakistan Match : सध्या जगभरात टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची चर्चा चालू आहे. या स्पर्धेत प्रत्येकवेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा जगभरातील क्रिकेटचे चाहते सगळं काम सोडून सामना पाहायला बसतात. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने दिसणार आहेत. श्रीलंकेत हा सामना होत असून तो संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. असे असतानाच आता या सामन्यावर नवं संकट उभं ठाकलं आहे. हा सामना होणार की नाही, याबाबत गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनिश्चितता होती. चर्चा आणि बैठकांनंतर पाकिस्तानने आम्ही भारताविरोधात सामना खेळण्यास तयार आहोत, असे सांगितले. असे असतानाच आता या पूर्ण सामन्याची तयारी झालेली असताना वाईट बातमी समोर येत आहे. त्यामुळे हा सामना होणार की नाही, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आजचा भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. परंतु त्याआधीच या सामन्यावर संकट आले आहे. येथे पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक चांगली बाब म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत या स्टेडियमच्या परिसरात कोणताही पाऊस झालेला नाही. त्यामुळे हा सामना होण्याची शक्यता अजूनही कायम आहे.
पावसाची शक्यता काय?
सकाळी या भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर मात्र पाऊस झालेला नाही. सामना सुरू झाल्यानंतरही पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अजूनही स्टेडियमवर काळे ढग जमा झालेले आहेत. त्यामुळेच पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाची रिमझिम सुरू झाली तर नाणेफेकीलाही उशीर होऊ शकतो. सध्याच्या अंदाजानुसार या भागात पाऊस होण्याची शक्यता 60 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.
अॅक्यूवेदरनुसार संध्याकाळी पाच वाजता पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सहा वाजता पाऊस होण्याची शक्यता ही 50 टक्के आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचे नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




