मुंबईतील पवई तलावाच्या काठावरच्या काही संध्याकाळी सहसा शांत असतात. पण त्या संध्याकाळी ती जागा निष्ठेच्या एका खोल उदाहरणाची साक्षीदार बनली. 70 ते 80 वयोगटातील काही निवृत्त व्यक्ती आपल्या रोजच्या गप्पांसाठी तिथे बसल्या होत्या. जसे घड्याळात पाच वाजले तसे त्यातील सर्वात टापटीप कपडे घातलेली एक व्यक्ती उठून उभी राहिली. “अरे मित्रा, थांब ना!’ एकाने आग्रह केला. “आइस्क्रीम पाच मिनिटांत येईल. थोडा वेळ बस, मग जा.’ त्यांनी नकार दिला आणि घरी जाण्यावर ठाम राहिले. पत्नीसोबत संध्याकाळचा चहा घेण्यासाठी. तेव्हाच एका तिसऱ्या मित्राने ज्याच्या आवाजात थोडी कडवट उदासी होती म्हटले, “एवढी घाई काय आहे? त्या तर आता स्मृतिभ्रंशाच्या (डिमेन्शिया) धुक्यात हरवल्या आहेत. त्यांना काहीच आठवत नाही. तू आला आहेस की नाही हे त्यांना कसं कळणार?’ त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. त्यांची नजर तीक्ष्ण होती आणि आवाजात संध्याकाळच्या हवेलाही थांबवणारी स्थिरता होती. ते म्हणाले, “त्यांना आठवत नाही, पण मला तर डिमेन्शिया झालेला नाही. मला आठवतंय त्या कोण आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासोबत तिथे असणं ही माझी जबाबदारी आहे.’ त्या शब्दांत इतका जडपणा होता की सर्वजण काही क्षणांसाठी शांत झाले. ही प्रेमाची सर्वोच्च व्याख्या आहे. अशी बांधिलकी, जी समोरच्याला समजण्यापलीकडेही टिकून राहते. काही वर्षांपूर्वीच्या या अनुभवाची आठवण मला तेव्हा झाली, जेव्हा शुक्रवारी रात्री एका पार्टी अँकरने मला विचारले की, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही अशी कोणती गोष्ट आहे, जी रोमान्स जिवंत ठेवते? माझे उत्तर साधे होते : लहान, न दिसणारे प्रयत्न तिने मला उदाहरण मागितले. कदाचित तिला एखाद्या भव्य कथेची अपेक्षा होती. पण मी सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल बोललो. मी श्रोत्यांना सांगितले की, माझ्या पत्नीची स्वच्छतेबद्दलची संवेदनशीलता ओळखून मी सार्वजनिक ठिकाणी नेहमी लक्ष ठेवतो. जसे मी एखाद्या हाउसकीपिंग टीमला काम संपवताना पाहतो, मी तिला लगेच सांगतो वॉशरूम आता स्वच्छ आहे, तुला वापरायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. ती अँकर भावुक झाली. तिने पाहुण्यांना सांगितले की, “बघा, हे किती योग्य बोलत आहेत. रोमान्स म्हणजे जगाला दाखवण्यासाठी हार्ट डिझाइनचा चॉकलेट बॉक्स नाही, तर कोणासाठी तरी केलेलं एखादं विचारपूर्वक ‘अदृश्य’ काम आहे.”माझ्यासाठी खरे प्रेम म्हणजे कोणतेही प्रदर्शन नाही. ते तितकेच साधे असू शकते, जितके माझे वडील ऑफिसमधून परतताना एक आण्यात विकत घेतलेला मोगऱ्याचा गजरा आईसाठी आणायचे किंवा रोज ठरावीक वेळी न चुकता चहासाठी हजर राहण्याचा तो शांत निर्णय. कारण हृदय आपले कर्तव्य कधीच विसरत नाही. रोमान्स ही अशी गोष्ट नाही, जिला एखाद्या साच्यात बसवता येईल. मी अशा पतींना ओळखतो, जे स्वयंपाकघरात स्टूलवर बसून कोथिंबीर साफ करतात किंवा भाजी चिरून देतात, जेव्हा त्यांची पत्नी स्वयंपाक करत असते. ते भाजी चिरण्याला साधे घरगुती काम मानत नाहीत; त्या बहाण्याने ते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात की आपल्या जोडीदाराला भावनिक आणि शारीरिक सुखासाठी काय हवे आहे. ते आयुष्य एकत्र अनुभवतात. दररोज पत्नीसाठी भाजी चिरणे हे खरं तर रोज एकमेकांना ‘डेट’ करण्यासारखेच आहे, जो रोमान्स जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे. संयुक्त कुटुंबात जिथे आई-वडील किंवा ज्येष्ठांच्या देखभालीची जबाबदारी असते अशी जोडपी सकाळी लवकर उठतात आणि स्वयंपाकघरात थोडा वेळ एकत्र घालवतात. कारण नंतर दोघांनाही अनेक भूमिका पार पाडायच्या असतात. मला नाही वाटत की अशी जोडपी आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी कधी महागड्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करत असतील. ते सामाजिक दबाव, चित्रपट किंवा कादंबऱ्यांमधून निर्माण झालेल्या काल्पनिक रोमान्सचे ओझेही वाहत नाहीत. एक गजरा कदाचित किरकोळ वाटू शकतो, पण विश्वास ठेवा, त्याचा प्रभाव खोल असतो. तो महाग नसतो, पण त्याचा सुगंध बराच काळ टिकतो. ते एकमेकांना हे सांगण्याचे एक साधे माध्यम आहे की ‘मी तुझा विचार करतोय.’ प्रेम कदाचित ‘परफेक्ट’ नसेल, पण ते ‘सुंदर’ नक्कीच असू शकते. फंडा असा की - स्वतःला विचारा अशा कोणत्या लहान-लहान गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी अशा प्रकारे करू शकता, ज्याची त्यांना खरोखर गरज होती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
महाराष्ट्र
- जुन्नर तालुक्यात खळबळ: जेवणाच्या भाजीत आढळली पाल; २८ शेतमजुरांना अन्नातून विषबाधा
- आता एटीएम आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; जाणून घ्या नवीन नियमनवी दिल्ली:कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
- नागपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना: पाण्याने भरलेल्या बादलीत पडून ११ महिन्यांच्या चिमुकलीचा अंत
- अंबाजोगाई (बीड): दहाव्याच्या विधीवेळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; दोन घरे जळून खाक, जाधव कुटुंबाचा संसार उघड्यावर
गुन्हा
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
- पुणे पोलिसांचा हिसका: खंडणी मागणाऱ्या गुंडांची पिंपरी-चिंचवडमध्ये धिंड; परिसरात दहशत पसरवणाऱ्यांना अद्दल घडवली
- अमरावती रेशन घोटाळा: कोट्यवधींच्या धान्य अपहारप्रकरणी दोन पुरवठा निरीक्षकांवर गुन्हे दाखल; गाडगेनगर पोलिसांत एफआयआर
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

पाषाणमध्ये धमकावून ४० हजारांची लूट, तर बिबवेवाडीत उपाहारगृहातून तब्बल २.३० लाखांची रोकड चोरी!
‘The Bollywood Beat’ बॉक्स ऑफिसचे विक्रम, सुपरस्टार्सचे आणि मोठ्या चित्रपटांच्या धमाकेदार अपडेट्स!
पोलिस भरती झाल्याचा बनाव करून २६ वर्षीय तरुणाने कुटुंबासह संपूर्ण समाजालाच फसवलं. #pune
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




