पुणे: इस्कॉनतर्फे रविवारी (दि. १९ जुलै) भगवान जगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या भव्य रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर, पुणे वाहतूक पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. रथयात्रेदरम्यान होणारी संभाव्य गर्दी आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता, दुपारी १ वाजल्यापासून ते सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील.
रथयात्रेचा मार्ग:
ही रथयात्रा टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकातून सुरू होईल. त्यानंतर ती टिळक रोड, बाजीराव रोड, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रोड, उंबऱ्या गणपती चौक (शगुन चौक), रमणबाग चौक, ओंकारेश्वर मंदिर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक या मार्गांनी प्रवास करून पुन्हा स. प. महाविद्यालयाजवळ संपेल.
वाहतूक पोलिसांनी सुचवलेले पर्यायी मार्ग:
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहनचालकांना खालील पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे:
१. स. प. महाविद्यालयातून रथयात्रा निघाल्यावर टिळक रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लाल बहाद्दूर शास्त्री रस्ता, सेनादत्त चौक आणि दांडेकर पूल चौकातून मार्गक्रमण करावे.
२. पूरम चौकातून टिळक रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांनी मित्रमंडळ चौकातून पर्यायी मार्ग निवडावेत.
३. रथयात्रा बाजीराव रस्त्यावर आल्यास, वाहनचालकांनी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक आणि शनिवार वाडा या मार्गांचा वापर करावा.
४. रमणबाग ते ओंकारेश्वर दरम्यान यात्रा असताना वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्ता किंवा लक्ष्मी रस्त्याचा वापर करणे सोयीचे ठरेल.
हे बदल केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीमुळे नागरिकांनी वेळेचे नियोजन करूनच प्रवासाला बाहेर पडावे.
शहर
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- मंगळवेढ्यात दुष्काळसदृश परिस्थिती: पावसाअभावी खरीप पेरणी ११ टक्क्यांवर ठप्प; चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
महाराष्ट्र
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- कोल्हापूर: माधुरी हत्तीणीच्या परतीचा मार्ग मोकळा; नांदणी येथील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी समितीला ५ ऑगस्टपर्यंत मुदत
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- कोल्हापुर: भरदिवसा राडा: अतिक्रमण हटवल्याच्या रागातून पाच जणांवर तलवारीने हल्ला, दगडफेकीने परिसरात खळबळ
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला



























Subscribe to my channel




