मुंबई: लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये खुर्चीवरून वाद, महिलेने सहप्रवाशांवर केला 'पेपर स्प्रे'चा मारा

मुंबई: उपनगरीय रेल्वे प्रवासात प्रवाशांमधील वाढता तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गुरुवारी सकाळी कल्याण ते सीएसएमटी (CSMT) धावणाऱ्या जलद लोकलमधील महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या वादादरम्यान एका महिलेने आपल्या पिशवीतून 'पेपर स्प्रे' काढून तो सहप्रवाशांच्या चेहऱ्यावर फवारल्याने डब्यात प्रचंड गोंधळ उडाला.

नेमके काय घडले?
कल्याणहून सकाळी ८:३३ वाजता सीएसएमटीच्या दिशेने ही लोकल निघाली होती. डोंबिवलीहून काही महिलांनी या डब्यात प्रवेश केला होता. मात्र, कल्याण स्थानकात लोकल आल्यावर रांगेत उभ्या असलेल्या महिलांनी डब्यात प्रवेश केला आणि डोंबिवलीपासून बसलेल्या महिलांना उठण्यास सांगितले. यावरून दोन्ही गटांत बाचाबाची सुरू झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि डोंबिवली गटातील एका महिलेने रागाच्या भरात पेपर स्प्रे फवारला.

 

पोलिस कारवाई आणि सामंजस्य:
या घटनेची माहिती काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइनवर दिली. मात्र, ठाणे स्थानकात पोलिस पोहोचण्यापूर्वीच गाडी तिथून निघून गेली. पुढे सीएसएमटी स्थानकात गाडी पोहोचताच रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी (GRP) संबंधित सर्व महिलांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, त्या महिलांनी परस्पर सामंजस्याने वाद सोडवण्याचे ठरवले आणि एकमेकींची माफी मागून वादावर पडदा टाकला.

वाढती अस्वस्थता:
लोकल प्रवासातील हिंसक घटनांची ही काही पहिलीच वेळ नाही. याच दिवशी मालडब्यात जागेवरू



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *