पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा खडकवासला धरण परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि विविध व्यावसायिक आस्थापनांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट धरणाच्या पाण्यात मिसळत असल्याचा अतिशय गंभीर प्रश्न पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत (General Body Meeting) चांगलाच गाजला. शहराच्या आरोग्याशी आणि नागरिकांच्या जिवाशी थेट जोडलेल्या या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नगरसेवकांनी थेट महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना 'वॉटर प्युरिफायर' (Water Purifier Machine) भेट देऊन अनोखा आणि तीव्र विरोध दर्शवला.
खडकवासला धरण परिसरातील गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी, कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रिसॉर्ट्स व व्यावसायिक आस्थापनांमधून दूषित सांडपाणी थेट धरणाच्या मुख्य जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला होता. खडकवासला धरणातून संपूर्ण पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाते. अशा अत्यंत महत्त्वाच्या धरणात थेट सांडपाणी मिसळत असल्याने लाखो पुणेकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावरून विरोधक अत्यंत आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा वैशाली बनकर, नगरसेवक सुहास टिंगरे, अमोल बालवडकर, नंदिनी धेंडे, रवी टिंगरे आदी नगरसेवकांनी महापालिकेत थेट आंदोलन करत महापौर आणि आयुक्तांच्या हातात वॉटर प्युरिफायर सोपवले. "पुणेकरांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ धरण परिसरात नियमित गस्त घालावी, दूषित पाणी सोडणाऱ्या हॉटेल्सवर व आस्थापनांवर कठोर कारवाई करावी," अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली.
दरम्यान, या अनोख्या आंदोलनावरून महापालिकेत राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप नगरसेवक पुनीत जोशी यांनी महापौरांना प्युरिफायर भेट देण्यावर जोरदार हरकत घेतली. "शहराला दूषित पाणीपुरवठा होण्यास जिल्ह्यातील उद्योग आणि ग्रामीण भागातील आस्थापना जबाबदार आहेत. त्यामुळे महापौरांना वॉटर प्युरिफायर देण्याऐवजी प्रथम जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनाच वॉटर प्युरिफायर भेट द्यावा," असा पलटवार त्यांनी केला. या राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले होते.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




