मुंबई: बळीराजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिले माफ.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या मोटारपंपच्या वीज जोडणीची जुनी थकित बिले राज्य सरकार माफ करणार आहे.

शेतकऱ्यांकडील सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची वीजबिलाची 'पाटी कोरी' होईल.

दिवसा वीज पुरवठा: सध्या राज्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

 

कर्जमाफीवर भाष्य: कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही, असे मत मांडत त्यांनी शेती क्षेत्रात गुंतवणुकीची गरज असल्याचे सांगितले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शेती विकासावर भर: जलयुक्त शिवार, शेततळे आणि ठिबक सिंचन यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर सरकार भर देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, भविष्यात शेती फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकीय टिप्पणी: हे सरकार महायुतीचे असून, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेताना निवडणुकीचा विचार केला जात नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

 



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *