पुणे: जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव (गाडीमोड) येथील एका गुऱ्हाळावर घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका २३ वर्षीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर, हा गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी रचलेला कट यवत पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे.
नेमकी घटना काय? मृत मजुराचे नाव रामू शंभू पासी (वय २३, रा. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे आहे. १९ जूनच्या मध्यरात्री १:३० च्या सुमारास खामगाव येथील गुऱ्हाळावर जेसीबीचे काम सुरू होते. यावेळी जेसीबी चालक आलम याने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने, तिथे गाढ झोपेत असलेल्या रामू पासीच्या अंगावरून जेसीबीचे जड चाक गेले. यात रामूचा जागीच मृत्यू झाला.
पुरावे नष्ट करण्याचा भयानक कट: घटनेनंतर भीतीपोटी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी, जेसीबी मालक अविनाश यादव याने तिथे उपस्थित असलेल्या इतर मजुरांना "हे कोणालाही सांगू नका, अन्यथा जीवे मारून टाकीन," अशी धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपींनी संगनमत करून रामूचा मृतदेह एका कारच्या डिकीत कोंबला. पहाटेच्या अंधारात हा मृतदेह वाघोली-राहू रस्त्यावर नेऊन टाकला, जेणेकरून त्याचा मृत्यू हा 'रस्ते अपघातात' झाला असल्याचे भासवता येईल.
भावाच्या जिद्दीमुळे पाप उघड: ठेकेदाराने रामू बेपत्ता झाल्याचा निरोप त्याच्या कुटुंबीयांना दिला होता. परंतु, रामूचा भाऊ राजू पासी याने उत्तर प्रदेशातून दौंडमध्ये येऊन दोन दिवस शोध घेतला. २१ जून रोजी गुऱ्हाळावर जाऊन त्याने कडक चौकशी केली असता आणि यवत पोलिसांत धाव घेतली असता, पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
कोणावर कारवाई? यवत पोलिसांनी जेसीबी चालक आलम, मालक अविनाश बाळासाहेब यादव, गणेश हरिभाऊ जगताप, कल्लू ऊर्फ प्रधान इस्तकार आणि इतर पाच जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या अमानवीय कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
शहर
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
महाराष्ट्र
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला





























Subscribe to my channel


