पुणे: केतन अग्रवाल हत्याप्रकरणात सिया गोयल हिच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नेटकरी संतापले असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमके काय घडले?
संजय गुप्ता यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सिया गोयलच्या अटकेबाबत एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी २०२० मधील सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीच्या बाबतीत झालेल्या 'मीडिया ट्रायल'ची आठवण करून दिली. सिया गोयलच्या बाबतीतही तशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे विधान त्यांनी केले.
संजय गुप्ता यांचे ट्विट:
गुप्ता यांनी लिहिले, "मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. मी फक्त एवढंच विचारतोय की रियासोबत जे घडलं, तेच सियासोबत करणं आपण थांबवू शकतो का? तो सर्व तमाशा आपण पाहिला आहे. टेलिव्हिजनवर ती 'ट्रायल' चालली आणि पुरावे सादर होण्याआधीच निकालही जाहीर केला गेला. आपण कधीच काही शिकत नाही."
नेटकऱ्यांचा संताप:
संजय गुप्ता यांची ही तुलना सोशल मीडिया युजर्सना अजिबात पटलेली नाही. त्यांनी या पोस्टला 'निरर्थक' आणि 'हास्यास्पद' म्हटले आहे. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले, "जर तुमच्यात थोडी जरी अक्कल शिल्लक असेल, तर ही पोस्ट मागे घ्या. जर ही घटना तुमच्या मुलासोबत किंवा मुलीसोबत घडली असती, तरी तुम्ही हेच म्हणाला असता का?" अनेक युजर्सनी त्यांना 'भावनाशून्य' असे संबोधून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी:
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचे लग्न ठरले होते, परंतु सियाला हे नाते मान्य नव्हते. ती चेतन नावाच्या तरुणाच्या प्रेमात होती. पोलीस तपासात असे समोर आले की, सियाने चेतनसोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचला. त्यांनी केतनला लोहागड किल्ल्यावर नेऊन तिथून खाली ढकलून दिले, ज्यामुळे केतनचा मृत्यू झाला. सध्या सिया आणि तिचा प्रियकर न्यायालयीन कोठडीत आहेत.
रिया चक्रवर्ती प्रकरणाची आठवण:
जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला मीडिया आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग आणि ट्रायलला सामोरे जावे लागले होते. ड्रग्ज प्रकरणात तिला अटकही झाली होती. मात्र, पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर पुराव्याअभावी तिची निर्दोष मुक्तता झाली होती. याच 'मीडिया ट्रायल'चा संदर्भ देत संजय गुप्ता यांनी हे भाष्य केले होते.
शहर
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
- पुणे: हो, आमच्याकडून चुका झाल्या, आवाज आणि स्पर्धा वाढली, आता नियमांचे पालन करू गणेशोत्सवापूर्वी पुणे साऊंड व्यावसायिकांची मोठी कबुली!
- पुणे: यंदाच्या उत्सवात पुणेकरांना अनुभवायला मिळणार कामाचा माणूस, अजितदादांच्या प्रशासकीय शैलीवर आधारित लक्षवेधी हलते देखावे!
- नाशिक: रस्त्यावरील चिखलामुळे दुचाकी घसरली, पाठीमागून आलेल्या बसच्या धडकेत विवाहितेचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: दोडामार्गात 'ओंकार' हत्तीचे प्रचंड तांडव! शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण!
- चिपळूण: महसूल विभागात खळबळ! जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- महाराष्ट्र: रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप! तटकरे कुटुंब भाजपमध्ये जाणार होतं, शिंदेसेनेच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ!
- पुणे: दहीहंडी वाहतूक अलर्ट; शहरात मोठे वाहतूक बदल आणि निर्बंध लागू, प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची घोषणा!
गुन्हा
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
- सांगली: पलूसमध्ये घरगुती वादातून पती-पत्नीचे टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला




























Subscribe to my channel




