बंगाल आणि बिहारमध्ये एनआरसीवर झालेल्या तीव्रवादामुळे बहुतेक भारतीय या प्रक्रियेकडे मोठ्या शंकेने पाहतहोते. अशातच एनआरसीचा तिसरा टप्पा सुरू होताचनागरिकतेच्या पुराव्याबाबत सरकारने दिलेल्या परस्परविरोधीविधानांनी संभ्रम अधिक वाढवला. अलीकडेच परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले की, 1955 च्या नागरिकता कायद्यानुसारपासपोर्ट हा नागरिकतेचा कायदेशीर दस्तऐवज नाही. 1967च्या पासपोर्ट कायद्यानुसार, हा केवळ प्रवासाचा एकदस्तऐवज आहे व त्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभकरणे हा आहे. या विधानाने हैराण झालेल्या लाखो देशवासीयांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केला. पासपोर्ट नाही, तरमग नागरिकतेचा निर्णायक पुरावा कोणता हे स्पष्टकरण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाने हा गोंधळ आणखी वाढवला. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनआरसी प्रक्रियेदरम्यान मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मतदार ज्या 12 कागदपत्रांचा वापर करू शकतात त्यात पासपोर्टचा समावेश असेल. आता केवळ वैध नागरिकांनाच मतदानाचा अधिकारअसल्याने आयोगाच्या या दाव्यावर एक रास्त प्रश्न निर्माणहोणे स्वाभाविक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच हे स्पष्टकेले आहे की, पासपोर्ट हा नागरिकतेचा ‘निर्णायक आणिस्वतंत्र पुरावा’ नाही, तर मग निवडणूक आयोग तो मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी कसा स्वीकारू शकतो?एकीकडे पासपोर्टधारक लोक चिंतेत आहेत की, ज्याबुकलेटला ते दीर्घकाळापासून आपल्या भारतीयनागरिकतेचा अंतिम पुरावा मानत आले आहेत तिची किंमतनक्की काय? तर दुसरीकडे गृह मंत्रालय यावर शांत आहे. भारतीय नागरिकतेची प्राप्ती, निश्चिती आणि ती रद्दकरण्याच्या तरतुदी नियमित करणारी नोडल मिनिस्ट्री गृहमंत्रालयच आहे. मात्र, या विषयावर सुरू असलेल्या वादातहस्तक्षेप करणे त्यांनी टाळले आहे. निश्चितच, नागरिकताहा एक कायदेशीर विषय आहे. पण कायद्याच्याबारकाव्यांच्या पलीकडे जाऊन, हा प्रश्न आपण भारतीयम्हणून जवळ बाळगत असलेल्या अनेक कागदपत्रांवरीलजनतेच्या विश्वासाचाही आहे. नेव्ही ब्लू रंगाचे हे छोटेसेबुकलेट नागरिकतेचा निर्णायक पुरावा आहे, असा विश्वासअनेक वर्षांपासून पासपोर्टधारक बाळगून होते. शेवटी,अर्जदार भारतीय नागरिक आहे आणि तो पासपोर्टमिळवण्यास पात्र आहे, याची पूर्ण खात्री पटल्याशिवायसरकार हे बुकलेट जारी करत नाही. यासाठी पोलिसपडताळणीही केली जाते. परंतु, हा विश्वास कदाचितचुकीचा होता. पॅन कार्ड हे कर भरण्यासाठी असते, हे आपल्याला माहीतआहे. ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला वाहन चालवण्याचीपरवानगी देते. आधार कार्ड हा ओळख आणि निवासाचापुरावा आहे, जो बँक खाते उघडण्यासाठी आवश्यकअसतो. कर भरण्यासाठी तो पॅन कार्डशी लिंक करावालागतो. तसेच मतदार ओळखपत्राने आपण मतदान करूशकतो हेही आपल्याला ठाऊक आहे. त्याच वेळी पासपोर्टहा देश-विदेशात आपल्या नागरिकतेचा पुरावा आहे, असेआपण नेहमीच मानत आलो. असे नसेल तर मगनागरिकता सिद्ध करणारा नेमका दस्तऐवज कोणता? 2019 मध्ये सरकारने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्येही असेम्हटले होते की, ‘जन्मतारीख आणि जन्म ठिकाणाशीसंबंधित कोणताही दस्तऐवज सादर करून नागरिकता सिद्धकेली जाऊ शकते. तथापि, अशा कागदपत्रांबाबतचा निर्णयअद्याप बाकी आहे.’ जेव्हा खुद्द सरकारच अशाकागदपत्रांबाबत संभ्रमात आहे, तर मग आम्ही कोणाकडेपाहायचे? समस्या नागरिक नोंदणी व्यवस्थेतही आहे.लाखो भारतीयांकडे जन्माचा दाखला नाही. कारण जन्मनोंदणी 1970 नंतर अनिवार्य झाली. याशिवाय शालेयप्रमाणपत्रे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि अगदीमतदार याद्यांमध्येही लोकांच्या नावात अनेकदा तफावतअसते. जेव्हा नागरिकता ही कायदेशीर तपासाची बाब बनते,तेव्हा कागदपत्रांमधील या त्रुटी मोठी अडचण निर्माणकरतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) 1955 च्या नागरिकता कायद्यानुसार, 1950 नंतरभारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती इथलीनागरिक मानली जाते. आपण भारतीय नागरिकआहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघर्षकरावा लागेल, असे आपल्यापैकी बहुतेकांनाकधी स्वप्नातही वाटले नव्हते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
- मुंबईत पावसाचा जोर! पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला; सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
- टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! सूत्रधार बिजेंद्र गुप्ताची पत्नी बिहारमधून अटकेत
- मुंबईत पावसाचा जोर! पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला; सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
गुन्हा
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!

























Subscribe to my channel


