
Pune : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षानुवर्षे दर शुक्रवारी पुण्यातील सर्किट हाउस येथे सकाळी सहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी उपस्थित असत. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना भेटण्यास पुण्यात उपस्थित राहणार असून, त्यासाठी ‘दादां’नी घालून दिलेला शिरस्ताही त्या पाळणार असल्याचे दिसते आहे. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शुक्रवारी ‘व्हीआयपी सर्किट हाउस’ येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी उपस्थित राहणार आहेत.
अजितदादा हे जवळपास १५ वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते. या काळात दर शुक्रवारी ते पुण्यात कार्यकर्त्यांना भेटत. त्यानंतर शनिवारी ते बारामतीला मतदारसंघात जात असत. सुनेत्रा पवार पुण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेले बहुतांश सदस्य त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत.
पुणे, मुंबई, बीड किंवा बारामतीला कोणत्याही विभागाची बैठक असो. त्या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार येणार म्हटल्यावर कर्मचारी, अधिकाऱ्यांपासून सचिवांपर्यंत विविध प्रकारची माहिती घेऊन सज्ज, तर विविध मागण्यांचे निवेदने घेऊन आमदार, खासदार लोकप्रतिनिधी बैठकीला जातीने हजर राहत. त्याशिवाय कार्यकर्त्यांची गर्दी ही वेगळीच. मात्र, अनेक मॅरेथॉन बैठका घेणाऱ्या अजितदादांच्या अनुपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पुण्यात झाली. एखाद्या अधिकाऱ्याकडून चुकीचे काम झाल्याची तक्रार येताच त्यांना तंबी देणारे, चांगल्या कामाचे कौतुक करणारे आणि मिश्कीलपणे हसत-खेळत चर्चा पुढे नेणाऱ्या अजितदादांची उणीव लोकप्रतिनिधींपासून ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलीच जाणवली.
दरम्यान, ‘कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमकरिता जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील झुंबर सभागृहात विविध बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील क्रिकेट स्टेडियम आणि झुंबर सभागृहाला अजित पवार यांचे नाव द्यावे,’ अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.
‘भविष्याचा वेध घेणारे दादा’
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यपद्धतील सुक्ष्म अभ्यासातून भविष्याचा वेध घेण्याचा आग्रह करणारे व्यक्तिमत्त्व होते. राज्याच्या प्रगतीत त्यांचे फार मोठे योगदान होते. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक खऱ्याअर्थाने वेळेत सुरू करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.’
भरणे म्हणाले, ‘अजित पवार यांच्या निधनाने राज्यासह पुणे जिल्ह्याचे नुकसान झाले असून, त्यांची पोकळी न भरून निघणारी आहे. राज्यासह पुणे जिल्ह्याची प्रगती करून सर्व क्षेत्रांत पुढे जावे हा त्याचा मानस होता. त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका होती.’
‘सर्वांना न्याय देण्याची भूमिका’
‘अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री; तसेच विरोधी पक्षनेता अशा विविध भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयाने कामे करीत असताना विविध विकासकामे मार्गी लागली. पायाभूत प्रकल्पांचे सादरीकरण समजून घ्यायचे. त्यामध्ये आवश्यतेनुसार बदल सुचवायचे. गोरगरीब सामान्य नागरिकांचे प्रश्न तळमळीने सोडवून त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती,’ अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावना व्यक्त केल्या. त्या वेळी दादांचे लोकोपयोगी स्मारक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



