नवी मुंबई पोलीस दलात मोठी उलथापालथ! १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या; नव्या जागी रुजू होण्याचे आदेश.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय कारणास्तव १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. हे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न (२) अंतर्गत जनहित आणि प्रशासकीय गरज लक्षात घेऊन जारी केले आहेत.

बदली झालेल्या १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नवीन नियुक्ती खालीलप्रमाणे आहे:

  • देविदास प्रभाकर कठाळे: सानपाडा पोलीस ठाण्यावरून रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • दीपक विजय सुर्वे: न्हावाशेवा पोलीस ठाण्यावरून सानपाडा पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • सुनील आनंदा वाघमारे: रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यावरून एनआरआय पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • दिपाली राहुल पाटील: खारघर पोलीस ठाण्यावरून उरण पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • सुरज ज्ञानदेव पाटील: सायबर/विमानतळ पोलीस ठाण्यावरून खारघर पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे: गुन्हे शाखेकडून न्हावाशेवा पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • ज्योती बाळासाहेब देशमुख: गुन्हे शाखेकडून कामोठे पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • बाळा रघुनाथ कुंभार: गुन्हे शाखेकडून पनवेल शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती.

  • गजानन शंकर कदम: तुर्भे पोलीस ठाण्यावरून गुन्हे शाखेच्या (AHTU) विभागात नियुक्ती.

  • चेतनाराज चौधरी: गुन्हे शाखेकडून वाहतूक शाखेत नियुक्ती.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजू होऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत



गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *