सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच केलेले ट्विट चर्चेत आले आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या समर्थनार्थ उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, राऊत यांनी कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का ठाकरे गटाला बसलेला असतानाच, आता विधानपरिषदेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटाची साथ दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या वतीने विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

हा अर्ज भरताना त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सचिन अहिर यांचा मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांसोबतचा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कवी सुरेश भट यांच्या 'उष:काल होता होता' या प्रसिद्ध कवितेतील खालील ओळी लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे:

"आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?



गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *