मुंबई: मुंबईतील मुलुंड परिसरातून वैवाहिक फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने लग्नाचे आमिष दाखवून आणि भावनिक साद घालून एका ४० वर्षीय महिलेला तब्बल २८ लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांचा गंडा घातला आहे. लग्नानंतर काही दिवसातच हे "पितळ" उघडे पडल्याने आरोपी नवरदेव पसार झाला असून, पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर फसवणुकीत:
पीडित वासंती (नाव बदलले आहे) ही मुलुंड पूर्व येथे राहते. विक्रोळी येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करत असताना तिची ओळख कमलेश दळवी याच्याशी झाली. कमलेशने आपल्या पत्नीचे निधन झाले असल्याचे सांगून वासंतीची सहानुभूती मिळवली. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. वासंतीचा विश्वास संपादन केल्यानंतर कमलेशने आर्थिक अडचणी, व्यवसायातील नुकसान अशी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली.
४ वर्षांत उकळले लाखो रुपये:
सन २०२० ते २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत कमलेशने वासंतीकडून २० लाख रुपये उकळले. त्यानंतर जेव्हा वासंतीने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्याने आपल्या भावाचा अपघात झाल्याचा बनाव रचला. त्याच्या उपचारासाठी वासंतीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून आणखी ८ लाख रुपये त्याला दिले.
लग्नानंतर उडाला फज्जा:
अखेर दोघांचे लग्न झाले, मात्र लग्नाच्या दिवशी कमलेशच्या बाजूने एकही नातेवाईक उपस्थित नव्हता, ज्यामुळे संशय बळावला. लग्नानंतर राहण्यासाठी घर घेण्याच्या नावाखाली तो पुन्हा पैसे मागू लागला. तपासात समजले की कमलेशकडे स्वतःचे घरच नाही. आपले खोटेपण उघड होत असल्याचे पाहून कमलेशने पळ काढला.
पोलिसांत तक्रार दाखल:
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वासंतीने नवघर पोलीस ठाण्यात कमलेश दळवी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
अशा प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शहर
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
महाराष्ट्र
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर























Subscribe to my channel




