Retired Policeman Duped: Promised Cheap Flat, Loses 15 Lakhs; Case Filed Against Cop’s Son

निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल

Retired Policeman Duped: Promised Cheap Flat, Loses 15 Lakhs; Case Filed Against Cop’s Sonमुंबई: सायन-अँटॉप हिल परिसरात स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून, मुंबई पोलीस दलातील एका निवृत्त सहाय्यक फौजदाराची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात पोलिसाच्या मुलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

नेमकी घटना काय? तक्रारदार हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि २०१७ मध्ये सहाय्यक फौजदार पदावरून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे, या उद्देशाने ते सायन-अँटॉप हिल परिसरात घराचा शोध घेत होते. दरम्यान, त्यांची ओळख असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा, अजिंक्य भोकरे याच्याशी त्यांची भेट झाली.

मार्च २०१९ मध्ये अजिंक्य भोकरे याने सायन कोळीवाडा येथील एका चार मजली इमारतीतील फ्लॅट दाखवला आणि तो ४७ लाख रुपयांत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. हा फ्लॅट स्वस्त दरात मिळत असल्याने तक्रारदाराने त्यात रस दाखवला. घराचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी संबंधित मालकाला ॲडव्हान्स म्हणून १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून भोकरे याने ५ एप्रिल २०१९ रोजी तक्रारदारांकडून १५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे (RTGS) स्वतःच्या बँक खात्यावर स्वीकारले.

 

फसवणूक कशी झाली? पैसे स्वीकारल्यानंतर जेव्हा तक्रारदाराने घराची कागदपत्रे मागितली, तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. बराच काळ उलटूनही घराचा ताबा मिळत नसल्याने तक्रारदाराला संशय आला. त्यानंतर त्यांनी दिलेले पैसे परत मागितले. मात्र, आरोपीने फक्त ४ लाख ५० हजार रुपयेच परत केले आणि उरलेले १० लाख ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला.



गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *